विदर्भ वमन न्यूज पोर्टल नागपूर – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीढचे उमेदवार जगदीश धनखाड यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवार मागरिट अल्वा यांचा परभात केला आहे़ धनकड यांना ५२८ तर मागरिट अल्वा यांना १८२ मते मिळाली़ काही विसांपूर्वी झलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला होता़ येतया ११ आँगसटरोजी ते या पदाची शपथ घेतील़
शनिवारी झालेल्या निवडणुकीत ७२५ खासदारांनी मतदान केले़ त्यातील १५ मते अवैध ठरली़ ५५ खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही़ संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार यासाठी मतदान करतात़ सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले़ संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरु झाली़ दोन तासांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला़

You missed