विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज (9 आॅगस्ट) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बºयांच स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती.

You missed