विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर –
बोलणे साधे तरी
होते त्याची बातमी
कुढतो तरी असा
आतल्या ही आत मी
कोण चालला कुठे
बातमीत वाचतो
कोण तो कोणासाठी
अकारण नाचतो
बातमीत राहणे
छंद लागतो नवा
पुढाऱ्यास तारते
वृत्तपत्राची हवा
बातमीच्या आतली
लोपली ती खबर
ताणली सारी मने
जणू की तो रबर
बातमीत का व्हावा
पर्वत तो राईचा
मामला बिघडतो
कधी कधी घाईचा
बातमीची सत्यता
लोकशाही आरसा
पत्रकारितेचा हा
भाग्यशाली वारसा
असाच वारा सुटेल काही
कंठात सूर फुटेल काही
जुलूम कोणी करतील जरी
उरात कोणी तुटेल काही
अराजकाचा फेरा आला
एकदुजाला लुटेल काही
गुंड मवाली देश लुटाया
एकजुटीने जुटेल काही
भयंकराचा डाव असा हा
समंध तोही उठेल काही
आल्या पाऊसधारा
आल्या आल्या पाऊसधारा जागवीत नवी नाती ग
मोती गळती नाजूक अन् गंधीत झाली माती ग
मौक्तिकमाला या जलधारा गीत गातो वारा ग
भूक निमाली या धरेची फुलला देह पिसारा ग
फुलून आली वनश्री ही वनात दौलत सारी ग
भिजली माती गात्रो -गात्री अशी दाटली धुंवारी ग
रंगाच्या सोबत आला श्रावण तो अलबेला ग
आकाशी झळकत आहे तो इंद्रधनूचा शेला ग
सरी मागून सरी येती जोडीत हिरवी नाती ग
मोती गळती नाजूक आणि गंधीत झाली नाती ग

हायकू
(विषय -पंचतत्त्व)
पृथ्वी आपली
शाश्वताने व्यापली
अवघी काया
जल सांडते
जगत भांडते
वर्षानुवर्षे
वायू बाहेर
अंतरात माहेर
जणू वसले
अग्नी प्रदीप्त
जठर चेतवीत
नित्य ज्वलन
आहे आकाश
उजळता प्रकाश
कोश तमाचा
पाच तत्वांचा
गोफ सार सत्वांचा
एकजिनसी
अंतिम वेळ
सरला सारा खेळ
प्रयाण यात्रा

You missed