विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.
संजय राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले. राऊत यांच्या घरी काल सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर संजय राऊत यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या आसपास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रूपयांची रोकड संजय राऊतांच्या घरातून जप्त करण्यात आली. याबरोबरच व्हायरल आॅडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलं. आज कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामिन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे.

You missed