विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – लोभी कुत्रा

एका भुकेल्या कुत्र्यास
काही मिळेना खायला
पोटी अन्नासाठी मग
लागे गाव फिरायला
खूप हिंडला फिरला
त्याला मिळाली भाकरी
मनी आनंद मावेना
बरसल्या हर्ष सरी
मुखी धरून भाकरी
तो धावला खूप खूप
पुलाखाली नदीमध्ये
त्यास दिसे त्याचे रूप
प्रतिबिंब चित्रामध्ये
त्याला दिसता भाकरी
फुटे आनंद उमाळा
लोभ वाढला हो उरी
केले भुंकायला सुरू
अति लालसा नडली
तोंडातील भाकरीही
नदी पाण्यात पडली
अति लोभ करी माती
लोभामुळे असे घडे
मग बसला उपाशी
घ्यावा बोध शिका धडे

You missed