विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर  – गुरुकृपा योग
गुरू कृपा योग।जीवनात घडे।
आयुष्यास कोडे।पडे नच।।१।।
गुरू भगवंत।गुरू कृपावंत।
मीही भाग्यवंत।त्यांच्या कृपे ।।२।।
योग्य दावी वाट।तीच गुरू भेट।
जीवनाचे थेट।करी सोने ।।३।।
गुरुविन देहा ।किंमत रे शून्य ।
कसे घडे पुण्य।तुम्हा हाती।।४।।
गुरू ईश रूप।कल्याणाचा कर्ता।
हाच दुःख हर्ता।कलयुगी।।५।।
गुरूपाठीराखा।उचलितो ठेका।
शिष्या दावी चुका।वेळोवेळी।।६।।
ऊर्जेचा प्रसाद।गुरूआशीर्वाद।
द्यावी तया साद। अखंडित।।७।।

You missed