विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – मानवाचे गुरू (अभंग)
आद्य गुरू माय। ममतेची साय।
वासराची गाय । संस्कारीत ।।
शिकविती बोल। सांभाळण्या तोल।
संस्कार सखोल। तीच पेरी।।
दुजा गुरू बाप ।दुर्गुणास चाप ।
सद गुण छाप । सोडी मुला ।।
सक्षम बनवी । व्यक्तित्व घडवी।
संकटे तुडवी । पायदळी ।।
तिजा तो शेजार । समाज विचार।
प्रसंगी आधार । देती लेका।।
चौथा गुरू शाळा । लावी लळा बाळा ।
ज्ञान कण गोळा । होती येथे ।।
पाचवे मास्तर । शिकवी अक्षर ।
ज्ञानाने साक्षर ।करी सर्वां ।।
गुरू सर्वश्रुत ।करुनि जागृत ।
पाजती अमृत । ते ज्ञानाचे ।।
दाखले दाखवी ।समाज शिकवी ।
जगणे टिकवी । समाजात ।।
हवे तेच घ्यावे । जादा ते वाटावे ।
निस्वार्थ जगावे । वृक्षासम ।।
सांगे जो जो छान । गुरू त्यास मान ।
टोचे युवा कान । शब्दातून ।।

You missed