विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधीन नवीन सचिवालय भवन सिविल लाईन्स येथील केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्यूरो, अमरावती रोड, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने 20 व 21 जून 2022 रोजी कम्युनिटी हॉल, कृषिकुंज, बजाज नगर, नागपुर येथे दोन दिवसीय विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त दिनांक 20 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता पासून रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. 21 जून 2022 रोजी सकाळी 6:00 ते 8:30 दरम्यान योग प्रशिक्षका कडून आरोग्याच्या रक्षणासाठी वेग-वेगळया प्रकारचे योग प्रात्याक्षिकाद्वारे योगासने करून घेण्यात येतील. याप्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एवं भूमि उपयोग नियोजन ब्यूरोचे संचालक डॉ. बी.एस. द्विवेदी, आणि प्रधान वैज्ञानिक डॉ.एम.एस. रघुवंशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्याद्वारे देण्यात आली आहे

