Home नागपूर नटराज निकेतन संस्थेच्यावतीने राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे तीन दिवसीय आयोजन.

नटराज निकेतन संस्थेच्यावतीने राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे तीन दिवसीय आयोजन.

16 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर:
नटराज निकेतन संस्था आणि संविद इंटरनॅशनल यांच्यावतीने आयोजित तीन दीवशीय किर्तीन महोत्सव, कविवर्य सुरेशभट सभागृह, रेशिमबाग येथे दि.12, मे ते 14 मे या दरम्यान सायंकाळी 7 ते 10 या वेळात महाराष्ट्राचे जुण्यापिढीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार, व्याख्याते, कवी वे. कीर्तनचार्य हरी भक्त परायण अण्णाजी पात्रीकर जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संकल्पना मुकुंद विलास पात्रीकर यांची आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आणि प्रवचनकार, व्याख्याते या महोत्सवात उपस्थित राहणार आहे. अशी माहीती यावेळी देण्यात आली. या राष्ट्रिय किर्तन महोत्सवाचे उट्घाटन १२ मे रोजी, रात्री ७:३० वा. श्री.श्री.1008 समर्थ सद्गुरु आचार्य श्री. जितेंद्रनाथ स्वामी महाराज, श्रीनाथ पिठाधिष्वर श्री श्रीनाथपीठ श्री देवनाथ मठ श्री क्षेत्र अजनगाँव सूर्जी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, पुणे यांचे छत्रपती संभाजी महाराज या विषयावर कीर्तन आहे. १३ मे रोजी, सायंकाळी ७ वाजता. बालकिर्तनकार कु.गार्गी मुकुंद पात्रीकर आणि कु.गायत्री निखिल व्यास यांचे युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या विषयावर कीर्तन असून रात्री ८ वाजता. एकल विद्यालय फाउंडेशन ऑफ इंडिया, दिल्लीचे चेअरमन आर्य रविदेवजी गुप्ता यांचे जल, विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर नावीन्यपूर्ण व्याख्यान आहे. १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता. राष्ट्रीय कीर्तनरत्न प्राचार्य डॉ.दिलीप डबीर यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस या विषयावर कीर्तनाचे आयोजन आहे. त्याचबरोबर धनराज यावलकर, हर्षद पायघन, श्रीधर कोरडे आणि निशिकांत देशमुख यांची वादनासाठी साथसंगत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांचे आहे. राष्ट्रभक्ती हीच खरी देवभक्ती आहे असा विचार कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवण्याचां आयोजना मागील उद्देश आहे. लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ यांचे आयोजनासाठी सहकार्य करीत आहे. आपण सर्वांनी सहपरिवारसह कीर्तन महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला पात्रीकर, विलास पात्रीकर, मधुरा व्यास, हर्षदा पात्रिकर, श्रद्धा पाठक, ॲड. रमण सेनाड, मेघना कुमरे, डॉ. भावना कुलसंगे आदी उपस्थित होते.