Home नागपूर रवीन्द्र जयंती सोहळ्यात लेखसंग्रहाचे प्रकाशन;

रवीन्द्र जयंती सोहळ्यात लेखसंग्रहाचे प्रकाशन;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर, 10 मे-
पत्रकार विनोद देशमुख यांनी कोरोनाच्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले “ऋषिकुलाचे वारसदार रवीन्द्रनाथ” हे छोटेखानी पुस्तक सोमवारी रात्री रवीन्द्रनाथांच्या जयंतीचा मुहूर्त साधून प्रकाशित करण्यात आले.  नागपुरातील बंगाली सामाजिक/सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी असलेल्या पाच मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यात डॉ. असितकुमार सिन्हा, प्रदीपकुमार मैत्र, प्रदीप गांगुली, विद्युत चक्रवर्ती, सुजित सेनगुप्ता यांचा समावेश होता. तापस सहा यांनी सूत्रसंचालन केले. शांतिनिकेतनच्या प्रत्येक भेटीत मला नवे रवीन्द्रनाथ गवसले, इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुप्रतिभाशाली होते. त्यामुळेच मी त्यांना जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कलावंत मानतो, अशी भावना विनोद देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. बंगाली असोसिएशन, बंगाली एज्युकेशन सोसायटी आणि सारस्वत सभा लायब्ररी यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या रवीन्द्र जयंती सोहळ्यात हे प्रकाशन पार पडले. नंतर “कविप्रणाम” कार्यक्रमात कलाकारांनी रवीन्द्र संगीत, तसेच रवीन्द्रनाथांच्या साहित्यकृतींचे सादरीकरण केले.