Home नागपूर वर्धेत झालेल्या अधिवेशनात प्रीती मेश्राम उपाध्यक्ष तर कल्पना हटवार सचिवपदी निवड;

वर्धेत झालेल्या अधिवेशनात प्रीती मेश्राम उपाध्यक्ष तर कल्पना हटवार सचिवपदी निवड;

25 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

सीटू आशा राज्य फेडरेशन अधिवेशनात प्रीती मेश्राम- उपाध्यक्ष, कल्पना हटवार – सचिव पदी निवड
महाराष्ट्र आशा- गटप्रवर्तक फेडरेशन च्या वर्धा येथे झालेल्या राज्य अधिवेशनात नागपूर मधून प्रीती मेश्राम यांची उपाध्यक्ष, कल्पना हटवार – सचिव पदी निवड करण्यात आली. त्याच बरोबर राज्य कौन्सिल सदस्य म्हणून अंजू चोपडे, शालिनी सहारे, लक्ष्मी कोट्टेजवार यांची निवड करण्यात आली. ७ व ८ तारखेला वडगाव येथे झालेल्या महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी आय टी यू चे राज्य अधिवेशन सी आय टी यु च्या केंद्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड उषारानी यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. अधिवेशनाला डॉक्टर कराड, शेख कॉ. शुभा शमीम आदी नेते उपस्थित होते. अधिवेशनाच्या खुल्या सत्राकरता ५० आशा वर्कर तसेच २५ प्रतिनिधी नागपूरवरून  कॉ.राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात उपस्थित होते.