Home नागपूर नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत जगातील सर्वात...

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पाचा भारताकडून प्रारंभ – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर;

16 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान (एनएफएचएम) या 363 कोटी रुपये खर्चाच्या जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम 4 मे 2022 पासून मंत्रालयाने सुरू केल्याची आज घोषणा केली. अनुराग सिंह ठाकूर यांनी आज पुण्यामधील यांनी फिल्म  एन्ड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिलेल्या भेटी दरम्यान ही घोषणा  केली.  या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम लवकरच एनएफएआयमध्ये सुरू होत आहे.

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत, अंदाजे 2,200 चित्रपट या पुनरुज्जीवित केले जातील. चित्रपट निर्माते, माहितीपट निर्माते, चित्रपट इतिहासकार, निर्माते इत्यादींचा समावेश असलेल्या भाषावार समित्या तयार करून यासाठी चित्रपट निवडण्यात आले आहेत. अपर्णा सेन, श्रीराम राघवन, अंजली मेनन आणि वेत्रीमारन यांसारख्या प्रख्यात चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा या समित्यांमध्ये सहभाग होता, अशी त्यांनी माहिती दिली.

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत सध्या सुरू असलेल्या फिल्म्सच्या स्थितीचे मूल्यमापन प्रक्रियेचे जतन, प्रतिबंधात्मक संवर्धन आणि डिजिटायजेशन अशा एकूण 597 कोटी रुपये तरतुदींच्या कामाचाही समावेश आहे, जी जगातील सर्वात मोठी चित्रपट जतन मोहीम आहे, असे ते म्हणाले.

आज शंभराहून अधिक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक चित्रपटसृष्टीत अतिशय वेगळे स्थान आहे. भारतीय चित्रपटांच्या पुनर्निर्मितीमुळे  अनेक दशकांपासून प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या  या चित्रपटांचे वैभव जिवंत करण्याची संधी पुन्हा एकदा  सध्याच्या आणि भावी पिढ्यांना मिळणार आहे असे त्यांनी सांगितले.

मध्यंतरी, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने सत्यजित रे  यांच्या 10 प्रतिष्ठित चित्रपटांच्या पुनर्निर्मितीचे कार्य हाती घेतले, हे चित्रपट नंतर विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित केले जातील. त्यापैकी प्रतिद्वंदी या चित्रपटाची 2022 च्या कानमहोत्सवातील कालजयी  विभागात प्रीमियर करण्यासाठी निवड केली आहे, असे ते म्हणाले.

सत्यजित रे यांच्या चित्रपटांच्या व्यतिरिक्त, ‘नीलाकुईल’ (मल्याळम) आणि ‘दो आखें बारह हाथ’ (हिंदी) सारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचाही समावेश केला जाईल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, चित्रपट प्रभाग  आणि इतर दुर्मिळ साहित्याच्या संग्रहातील स्वातंत्र्यपूर्व काळातील अत्यंत महत्त्वाचे लघुपट  आणि माहितीपट देखील पुनर्निर्मित केले जातील. कारण इतर कुठेही दाखवण्यात न आलेली  भारताचा विकासाची गाथा त्यात दाखवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

पुनरुज्जीवन प्रक्रियेविषयी

या प्रक्रियेमध्ये फ्रेम टू फ्रेम डिजिटल आणि सेमी ऑटोमेटेड मॅन्युअल पिक्चर आणि शिल्लक राहिलेल्या सर्वोत्तम स्रोत सामग्रीमधून ध्वनी पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे. या स्रोत असलेल्या निगेटिव्ह/ प्रिंट यांचे 4K ते .dpx फाईल्स असे स्कॅनिंग होईल. पिक्चर निगेटिव्हच्या प्रत्येक फ्रेमवरचे ओरखडे, धूळ, अस्पष्टपणा यांसारखे दोष या पुनरुज्जीवन प्रक्रियेत काढून टाकले जातील. दृश्यांच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेप्रमाणेच ध्वनीचे देखील पुनरुज्जीवन केले जाईल. साउंड निगेटिव्हवरील अनेक प्रकारचे तुटक आवाज, खरखर, घर्षणाचे आवाज आणि तुटकपणा डिजिटली काढून टाकले जातील. पुनरुज्जीवनानंतर डिजिटल दृश्य फायली कलर ग्रेडेड (डीआय प्रक्रिया) होतील आणि मूळ प्रदर्शनाच्या वेळी चित्रपट जसा होता तसा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.