Home नागपूर सनातन संस्था नागपूरच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडीचे’ आयोजन;

सनातन संस्था नागपूरच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडीचे’ आयोजन;

11 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत प. पू. डॉ. जयंत बालाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था नागपूरच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सर्वप्रथम अध्यात्मिक हिंदू राष्ट्राची संकल्पना समाजासमोर मांडली. धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र हेच हिंदुसमोरील सर्व समस्यांवरील एकमेव परिणामकारक उपाय असून ते विश्वासाठी मार्गदर्शक ठरेल हे लक्षात आणून दिले. तेव्हापासून लक्षावधी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, देशभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना या हिंदुराष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी संघटीतपणे प्रयत्न करत आहेत.

आज धर्मांतरण, गोहत्या, भ्रष्टाचार, मंदिरांचे सरकारीकरण, संस्कृतीवर होणारे आघात अशी राष्ट्र आणि धर्मावर चहूबाजूनी संकटे घोंघावत असताना कधी नव्हे इतकी हिंदू ऐक्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदुनी संघटीत होऊन प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठीच सनातन संस्थेच्या वतीने “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जागृत हिंदूने या हिंदू एकता दिंडीत सहभागी होऊन राष्ट्र आणि धर्मरक्षणाच्या कार्यात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.