Home नागपूर “गोवा येथे आयोजित बहुभाषिक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या प्रा. विजयाताई मारोतकर...

“गोवा येथे आयोजित बहुभाषिक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या प्रा. विजयाताई मारोतकर यांची निवड”;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

“महाराष्ट्राबाहेर गोवा येथे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदा चे निमंत्रण येणे, हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून आम्हा सर्व नागपूरकरां करिता अभिमानाची बाब आहे, त्यामुळे सर्व साहित्यिक संस्थांनी एकत्र येऊन त्यांना सम्न्मानीत करणे आवश्यक आहे,असे मला वाटते.” असे उदगार सत्कार समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी मा. रमेशचंद्र दिक्षीत यांनी काढले .
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक  प्रा. विजयाताई मारोतकर यांची गोवा सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या
इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या वतीने दि  7 मे 2022 रोजीआयोजित  “बहुभाषिक महिला साहित्य संमेलना ” च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी …
साईनाथ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल घोगली,नागपूर चे संचालक डॉ.अरविंद बुटले तसेच उपाध्यक्ष विशाल देवतळे आणि सचिव मंगेश बाबसे उपस्थित होते. मा. रमेशचंद्र दीक्षित पुढे म्हणाले  -“गोव्यामध्ये आयोजित होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयाताईंची निवड होणे ,ही आम्हा सर्व नागपूरकरांसाठी अतिशय सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःची
घोडदौड सुरू असतानाच आपल्यासोबत इतरांना पुढे नेण्याची त्यांची कार्यनिष्ठाच त्यांना या पदापर्यंत घेऊन गेलेली आहे. मी त्यांना शुभेच्छा  देतो. प्रमुख अतिथी डॉ. अरविंद बुटले म्हणाले की-” मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान मुळे  नवोदितांना तसेच अन्य व्यवसायातील कवी /कवयित्रीना सामावून घेणारे एक  हक्काचे व सन्मानाचे व्यासपीठ प्राप्त झालेले आहे, आम्हा वैद्यकीय क्षेत्राला त्याचा आनंद आहे .नुकत्याच नागपूरात पार पडलेल्या मायमराठीच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाने मराठी विश्वात आपली स्वतःची ठसठशीत अशी नाममुद्रा उमटविलेली आहे.जणू
निष्काम कार्याचे हे फळ म्हणून सन्मान प्राप्त झालेला असावा. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील कार्याला शुभेच्छा देतो.”
उपाध्यक्ष विशाल देवतळे यांनी प्रास्ताविक केले.
गोवा सरकार अंतर्गत
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रांगाझा द्वारा दि. 7 मे 2022 रोजी  पणजी – गोवा येथे आयोजित  बहुभाषिक  माहिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक
प्रा. विजया मारोतकर यांची निवड करण्यात आलेली आहे.मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असलेल्या प्रा.विजया मारोतकर यांनी नुकतेच धनवटे नॅशनल कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले. नितांत उत्साहात ,नागपूर शहरात संपन्न झाले. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेतली जावी. हा एक दुग्धशर्करा योग वाटतो. प्रा.विजया मारोतकर यांचे काव्य, कविता ,कथा, समीक्षा, वैचारिक, चरित्र, कादंबरी असे सर्वच प्रकारच्या लेखनात पस्तीस पुस्तके प्रकाशित आहेत.’बेटी बचाव’ या विषयाअंतर्गत  “पोरी जरा जपून” या कार्यक्रमामार्फत त्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना मार्गदर्शन करण्या करता सर्वत्र जातात. महाराष्ट्रात व बाहेर आजवर त्यांचे 302 कार्यक्रम पार पडलेत, किती तरी मुलींचे जीवन वाचविता आले. केवळ लेखनच नव्हे तर लेखना सोबत असे सामाजिक कार्य असलेल्या विजया मारोतकर भारतात 2019 मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत.त्यानंतर त्यांनी विदर्भातील समस्त लेखिका ,कवयत्री यांना एकत्रित करून त्यांच्या करता नुकताच
काव्यवसा हा उपक्रम राबवून 204 कवयित्रींच्या 408 कवितांची चार पुस्तके प्रकाशित केलीत. ज्याचा प्रकाशन सोहळा मराठी भाषा गौरव दिनी  शेगाव येथे माहेश्वरी भवन मध्ये नितांत थाटात संपन्न झाला.
       असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या विजया ताईंची गोवा सरकारच्या वतीने आयोजित होत असलेल्या बहूभाषिक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे,
        सत्कार समारंभाचे अध्यक्ष ,प्रमुख अतिथी व मंचावरील सर्व मान्यवरांनी
शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन
प्रा.विजयाताई  मारोतकर यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना विजयाताई म्हणाल्या की-” काहीतरी मिळावे या अपेक्षेने मी कधीच कार्य करीत नसते. नुकतेच संपन्न झालेले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन आणि लगेच गोवा संमेलन अध्यक्षपदी निवड होणे, हा केवळ एक योगायोग आहे .पुढे मागे मला व्याख्याना करता गोव्याला बोलावणे येऊ शकते ,याची कल्पना होती, परंतु अशा स्वरूपात माझी निवड होईल, हे मला अजिबात अपेक्षित नव्हते, त्यामुळे साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड होणे ही, माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय तितकीच सन्मानाची बाब आहे. याचे श्रेय माझे एकटीचे नाही तर माझ्यासोबत कार्यरत असणाऱ्या सर्वच मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या सदस्याचे आहे .महाराष्ट्र आणि गोवा  साहित्यिक सेतुबंध तयार होत आहेत. याचे पुढील पडसाद नक्कीच चांगले पडतील याची मला अपेक्षा आहे.”
           मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे सदस्य गोविंद सालपे व डॉ.शैल बागडे यांनी विजयाताई प्रति लिहीलेल्या सुरेख कवितांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या तर याप्रसंगी सचिव मंगेश  बावसे, कोषाध्यक्ष डॉ.माधव शोभणे ,
प्रा.प्रभाकर दांडेकर, प्रा. विनय पाटील,प्रणौती कळमकर, क्रिडा अधिकारी माया दुबळे,  यांनी शुभेच्छा  व्यक्त केल्या.पाच वर्षीय सिद्धी आशिष मारोतकर हिने 1 मे कामगार दिनानिमीत्त भाषण दिले.अरुणा कडू यांनी सर्वांचे आभार मानले, या कार्यक्रमाचे सुरेख व नेटके संचालन अरुणा भोंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ.माधव शोभणे, अरुणा भोंडे, विषाल देवतळे,मंगेश बावसे यांचेसह अनेकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या सदस्यांसह विजया ताईंचा परिवार आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.