Home नागपूर बस चालकास मारहाण च्या गुन्ह्यात सर्व आरोपी निर्दोष मुक्त;

बस चालकास मारहाण च्या गुन्ह्यात सर्व आरोपी निर्दोष मुक्त;

23 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

सत्र न्यायाधीश, नागपूर यांचे न्यायालयात (सुनिल मा. पाटील, अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१२)
सत्र खटला क्रमांक ४७९/२०१९
महाराष्ट्र शासन,
जुना क्रमांक (नियमित फौजदारी खटला क. ९१/२०१६) } पोलीस स्टेशन सावनेर, नागपूर
तर्फे पोलीस स्टेशन अधिकारी,
– विरुध्द
अभियोग पक्ष
१)रायसन उर्फ टायसन केशवराव नंदनवार, वय २८ वर्ष, व्यवसाय: शिक्षण, } राहणार रेल्वे स्टेशन मागे, सावनेर, } ता. सावनेर, जि. नागपूर
२) अजय शिवकुमार टोंडरे,
वय २२ वर्ष, व्यवसाय: शिक्षण, राहणार वाघोडा झोपडपटटी. सावनेर, ता. सावनेर, जि. नागपूर
३) दिनेश दिवाकर मारबते,
वय २९ वर्ष, व्यवसाय: शिक्षण,  राहणार मुरलीधर मंदीराजवळ, सावनेर  ता. सावनेर, जिल्हा नागपूर
आरोपी 1 to 3
सत्र खटला कमांक ४७९/२०१९
न्यायनिर्णय…….
अभियोग पक्षातर्फे सहा सरकारी वकील श्री आर. जी. डागोरीया आरोपीतर्फे वकिल श्री राजेंद्र शाहू
न्यायनिर्णय (दिनांक १२.०४.२०२२ रोजी पारीत)
आरोपींविरुध्द भा.दं.वि. ३५३,३३२,१८६ सहकलम
नुसारच्या गुन्ह्यांकरीता आरोप निश्चित करण्यात आला आहे.
फिर्यादी पक्षाचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणे: दिनांक २९.१०.२०१५ रोजी फिर्यादी अशोक मनोहर कुंभलकर हे सावनेर बस आगार येथे बस चालक म्हणून कार्यरत असताना सायंकाळी ६.१५ वाजता ते बस क्रमांक एम.एच-४०-८३२९ ही सावनेर ते केळवद घेवून जात होते. त्यावेळी बसमध्ये विश्वनाथ लक्ष्मणराव रोकडे हे वाहक होते व त्या बसमधून १० ते १२ प्रवाशी प्रवास करत होते. सावनेर येथील राजकमल हॉटेल जवळ ते बस घेवून आले असता चुकीच्या दिशेने दोन मोटरसायकल घेवून ३ इसम आले व त्यांनी त्या मोटरसायकल बस समोर उभ्या केल्या. त्यामुळे त्याने बस थांबविली असता ते तिघेही त्यास शिवीगाळ करू लागले व बसमध्ये घूसून त्यांनी वाहकासह त्याला हातबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर ते तेथून पळून गेले. यानुसार त्या इसमांनी शासकीय अडथळा निर्माण करून मारहाण केल्याने त्यांचे विरूध्द कारवाई करावी असे त्याने कळविले.
सदर फिर्यादीनुसार आरोपींविरुध्द भादंवि कलम ३५३,३३२, १८६ सह ३४ नुसार गुरनं १९३/२०१५ नोंदविण्यात आला व त्याचा
३ तपास पो. हे कॉ. मन्नान नौरंगाबादे यांचेकडे सोपविण्यात आला.
४. पो.हे. कॉ. नौरंगाबादे यांनी त्यानंतर दोघा पंचासमक्ष फिर्यादीने दाखविलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच त्यांनी साक्षदारांचे जबाब नोंदविले व सदर गुन्ह्याकामी तिघाही आरोपींना अटक केले
तपास पोहे को मन्नान नौरंगाबादे यांचेकडे सोपविण्यात आला.
४ पो.हे.का. नौरंगाबादे यांनी त्यानंतर दोघा पंचासमक्ष फिर्यादीने दाखविलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच त्यांनी साक्षदारांचे जबाब नोंदविले व सदर गुन्ह्याकामी तिघाही आरोपींना अटक केली. त्यांनी घटनेवेळी आरोपी अजय तोंडरे व रायसन यांनी वापरलेल्या मोटारसायकली पंचासमक्ष पंचनाम्याद्वारे जप्त केल्या आरोपींची यथावकाश जामीनावर मुक्तता झाली. तपासकामी आरोपींनी संगनमताने तथाकथीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने तपासाअंती त्यांनी आरोपी विरुद्ध न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सावनेर, जिल्हा नागपूर यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले
५. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सावनेर जि. नागपूर यांचे न्यायालयात आरोपपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आरोपींविरुध्द वरील गुन्ह्यांबाबत दखल घेवून निशानी २ प्रमाणे आरोपींना त्यांचेवरील आरोप थोडक्यात समजावून सांगून निशानी ३ ते ५ वर त्यांचे निवेदन नोंदविले. आरोपींनी गुन्हा नाकबुल असल्याचे सांगुन संपरिक्षेची तयारी दर्शविली, त्यानंतर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालयासमोर फिर्यादी पक्षाने पंच मनोहर किसनजी ईखार याची सा.क. १ म्हणून निशानी ७ वर, नामदेव रामरावजी राऊत याची साक्ष सा.क्र. २ म्हणून निशानी ९ वर श्याम गुड्डू यादव याची साक्ष सा क्र. ३ म्हणून निशानी १४ वर घेतली. त्यानंतर भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ व ३३२ नुसारच्या गुन्हयांबाबतचे खटले सत्र न्यायालयासमोर चालण्याबाबत संबंधीत अधिनियमांमध्ये/प्रकीया संहीतेमध्ये दुरुस्ती झाल्याने
दिनांक ०६.०७.२०१९ रोजीच्या आदेशानुसार सदर खटला सत्र न्यायालयाकडे चालण्याकरीता पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा भादंवि कलम ३५३,३३२,१८६ सह ३४ नुसार गुन्हयांबाबत या न्यायालयात निशानी १६ वर आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले व निशानी १७ ते १९ वर त्यांचे निवेदन नोंदविण्यात आले. आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले
न्यायालयात एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले त्यात बस चा चालक व कंडक्टर हे महत्त्वाचे साक्षीदार होते तसेच बस मध्ये बसलेले प्रवासी यांनी पण जमून गवाही न्यायालयात दिली तसेच तापसीक अंमलदार यांनी आरोप पत्र कसे तयार केले हे सांगितले व बयान नोंदविले हे सांगितले , परंतु आरोपीच्या वतीने जेव्हा या सर्व गवाही दारांना उलट तपास करण्यात आले तेव्हा हे दिसून आले की त्यांच्या बयानात अत्यंत विसंगती आहे व ते एक मेकास साहाय्य करीत नाही
तापसीक अंमलदार यांच्या उलट तपासात असे आले की त्यांनी शिनाखत परेड चे नियमांचे पालन केले नाही .
तसेच आरोपी 1ते 3 हे घटने ठिकाणी हजर होते हे पण सिद्ध करू शकले नाही .
न्यायनिवाड्या अंती सन्मानिय न्यायालयाने संशयाचा फायदा आरोपीस देत , पुराव्या अभावी आरोपी 1 ते 3 यांची निर्दोष मुक्तता केली .
आरोपीच्या वतीने Adv. राजेंद्र साहू, Adv. गुरप्रितसिंग चंडोक, ध्रुव लेकवानी, गौरव साहू, वृषभ मोजनकर, पराग कुसरे यांनी कामकाज पाहिले.