Home नागपूर आकार मल्टिपर्पज़ फाऊंडेशन “तर्फे बुद्ध-भीम गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न;

आकार मल्टिपर्पज़ फाऊंडेशन “तर्फे बुद्ध-भीम गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न;

12 views
0
  • विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
भारतरत्न महामानव प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त”आकार मल्टिपर्पज़ फाऊंडेशन “तर्फे बुद्ध-भीम गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न*
    आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने बुद्ध भीम गीतांचा सुमधुर संगीतमय कार्यक्रम
नुकत्याच झालेल्या ३० एप्रिल रोजी, टेकडी बुद्ध विहार, अंबाझरी नागपूर येथे यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमदर प्रकाश गजभिये, राष्ट्रपती सन्मान प्राप्त आंतरराष्ट्रीय तबला आर्टिस्ट विश्वविख्यात आचार्य पं. डॉ.प्रशांत गायकवाड, शल्यचिकित्सक डॉ.नरेंद्र कोडवते, नागपूर बाज़ार न्युज़ च्या संपादिका  ज्योती द्विवेदी, DTR INDIA न्युज़ चे संपादक राहुल शर्मा, बुद्धीविहाराचे अध्यक्ष हिरालाल हडके, प्रामुख्याने उपस्थिती दिली. सर्व अतिथींना, गायक-वादक कलाकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणमान्य अतिथींच्या हस्ते बाबासाहेबांना हार घालून  व दीप प्रज्वलीत करून झाली. आकार फाउंडेशन च्या संचालिका व गायिका अनिता मसरामनी “बुद्धम् सरणम् गच्छामि च्या मंत्रोच्चार करून सुरुवात करून साजरी भीम जयंती करू, ज्ञानसूर्य तू इस जगत का भीमराव महान, भिमाची लेक मी शिकाया चालली abcd, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं” हे गीत सादर केले. गायक अश्मक लांडगे यांनी “प्रथम नमो: गौतमा, जन्मास आले भीम बाळ गायले” विशेष अतिथी प्रसिध्द गायक वीरेंद्र बोरडे यांनी “दोनच राजे इथे गाजले” हे गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, लोक कलाकार गायक मारुतीराव उईके यांनी “यही है आरजू मेरी दलितो” हे बाबासाहेबांवर स्वरचित गझल सादर केली, डॉ.ममता मेश्राम, डॉ.सुनील मेश्राम, संगीता फुले, वंशिका फुले यांनी सुमधुर गीतांचे सादरीकरण केले आणि वादक कलाकार:ऑर्गन -सौरभ किल्लेदार, ऑक्टोपॅड-राज माळवे, ढोलक-सचीन खडोते, काँगो-भूषण माळवे, यांनी जबरदस्त साथ दिली. संचालन-मनीष वानखेडे यांनी केले. आकार मल्टीपर्पज फाऊंडेशनचे संयोजक अनिता मसराम यांनी ही माहिती दिली.