Home नागपूर मशिदींवरील भोंगे हटवण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणार्‍या सर्व राज्य सरकारांवर...

मशिदींवरील भोंगे हटवण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणार्‍या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा !

21 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

अजान देणेहा धार्मिक अधिकार असू शकतोपण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणेहा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाहीतसेच ध्वनीप्रदूषण करून इतरांच्या मौलिक अधिकारांचे हनन करणार्‍या भोंग्यांवर कारवाई केली पाहिजेअसे सर्वोच्च न्यायालय आणि देशातील सुमारे 15 उच्च न्यायालये यांचे स्पष्ट आदेश आहेतज्याप्रमाणे बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे उत्तर प्रदेशातील कल्याणसिंह सरकारवर अवमान केल्याची कारवाई करण्यात आली होतीतशीच कठोर कारवाई मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण रोखले नाहीम्हणून न्यायालयाचा अवमान करणार्‍या देशांतील सर्वच राज्य सरकारांवर करायला हवीअसे रोखठोक प्रतिपादन लष्करहिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले आहेहिंदु जनजागृती समितीच्या वतीने मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणारे ध्वनिप्रदूषण कायदा आणि न्यायालय का म्हणते ?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होतेया वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्रीवैभव आफळे आणि कुक्रांती पेठकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना ते उत्तर देत होते.

   विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना श्रीखंडेलवाल म्हणाले कीप्रार्थनास्थळांवर लावण्यात येणार्‍या भोंग्यांचा वापर हा धार्मिक कामांऐवजी समाजात वर्चस्व आणि कटुता निर्माण करण्यासाठी चालू आहेउत्तर प्रदेशात रमजान महिन्यात मशिदींवरून भोंग्याद्वारे अजान म्हणण्यासाठी अनुमती मिळावीम्हणून वर्ष 2020 मध्ये माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि बसपाचे खासदार अफजल अन्सारी यांनी जनहित याचिका केली होतीत्यावर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाचा वापर न करता मदिशींच्या मिनारावरून अजान देण्यात यावी‘ असे स्पष्टपणे म्हटले आहेतसेच ज्यांना आवश्कयता नाही वा आवडत नाहीअशांना जबरदस्तीने अजान ऐकवणेहे त्यांच्या मुलभूत अधिकाराचे हनन आहेत्यामुळे अनुमतीशिवाय भोंगा वापरून वा ध्वनीप्रदूषण विषयक कायद्याचे उल्लंघन करून जर कोणी अजान देत असेलतर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेअसेही न्यायालयाने म्हटले आहे.

    एकीकडे हिंदूंच्या दहीहंडी वा अन्य धार्मिक उत्सवांच्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय आल्यावर हिंदू त्याचे लगेच पालन करतात आणि सरकारही त्याची काटेकारपणे अंमलबजावणी करतेमात्र मुसलमानांच्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय आल्यावर मुसलमान त्याचे पालन करत नाहीतहे कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेउलट अनेक मौलाना हे मुसलमानांना भडकवण्याचे काम करतातबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी ही वायफळ चर्चा असल्याचे म्हटले आहेहे मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी देशभरात चालू आहेखरे तर सर्वोच्च न्यायालय आणि 15 उच्च न्यायालये यांच्या आदेशांचे राज्य सरकारांनी स्वत:हून पालन केले पाहिजेअसेही श्रीखंडेलवाल यांनी शेवटी म्हटले आहे.