विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
शिवसेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने ५०० बोटल कोल्ड्रिंग वाटप करण्यात आली. तसेच शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सर्व पोलीस निरीक्षकांचे शिवसेना तर्फे स्वागत करण्यात आले. १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिनानिमित्त शिवसेने नेते व महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्री मा.एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात व भा.वि.सेना पूर्व संपर्क प्रमुख महेश उमरेडकर जिल्हा प्रमुख डॉ. रामचरन जी दुबे व शिवसेनेचे नागपूर शहर युवा नेतृत्व करणारे प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणारे पोलीस स्टेशनला शिव सेना शिष्टमंडळनी भेट दिली व धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, बजाज नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख बेलतरोडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव व पोलीस स्टेशनचे स्टाफचे स्वागत करून एक मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आली. याप्रसंगी समस्त शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख दिनेश वानखेडे, विलास पराये, शहर प्रमुख सचिन बा. शर्मा मीनाताई अडकणे, उपशहर प्रमुख नीलकंठ काचेवार, किशोर गिरी, पराग दामले, किसनलाल मालवी, रजत चव्हाण, सुशील उईके विधानसभा संघटक करुणाताई शिंदे, राजेंद्र तिवारी, निलेश डुंबरे प्रमुख प्रभात प्रमुख राकेश साहू, राहुल हेडाऊ, नीलकंठ साहू, बाळ शिवसैनिक आर्यन शर्मा व आदर्श शर्मा आदि पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी कार्यक्रमाला यशस्वी बनवण्याकरिता उपस्थित होते.

