Home नागपूर नृत्य व गायन स्पर्धा.

नृत्य व गायन स्पर्धा.

19 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने नृत्य व गायन स्पर्धेचा अनोखा उपक्रम.
स्व.लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ राजस्थानी महिला मंडळ नेहमी प्रमाणे ‘नागपूर सुपर सिंगर’ आणि ‘नागपूर सुपर डान्सर’ ही आगळीवेगळी स्पर्धा घेऊन येत आहे, अशी माहिती राजस्थानी महिला मंडळाचे अध्यक्षा शुभा धीरन आणि सचिव ज्योती हेडा यांनी दिली. 12 वर्षांची मुले आणि मुलींन करिता स्पर्धा घेण्यात येत आहे. आपणास आपल्या पसंती च्या आवडत्या गाण्याचा 1.30  मिनिटांचा व्हिडिओ घरी बसून बनवावा लागेल. ज्यांना डान्स करायचा आहे. त्यांनी 1:30 मिनिटांचा डान्स व्हिडिओ पाठवायचा आहे. अशांची निवड केली जाईल. त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्याची आणि बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही, ललिता मंत्री -9326165250 आणि शुभा धीरन -9422503815 सुषमा डांगरा, सुनंदा लड्डा, विद्या लड्डा, श्रुती गांधी, शोभा हेडा, वीणा गट्टानी, सरोज सोमाणी, सरिता सारडा, यांच्याशी संपर्क साधू शकता.