Home नागपूर सामाजिक सलोख्याचे रक्षण करा – जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ;

सामाजिक सलोख्याचे रक्षण करा – जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ;

14 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

ईद आणि रमजान च्या काळात राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा कार्यक्रम करण्याचे जे जाहीर केले, त्यामुळे सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता व सलोखा याचे रक्षण करण्याची मागणी करत आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अरुण लाटकर जनता दलाचे रमेश शर्मा व विजयकुमार खोबरागडे रिपब्लिकन पक्षाचे यशवंत तेलंग व केवल मेश्राम बुद्ध विहार समन्वय समितीचे संयोजक अशोक सरस्वती यांनी संयुक्तपणे हे निवेदन सादर केले. या संदर्भाने मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील सर्व राजकीय पक्ष तसेच या संबंधाने उपयोगी पडू शकतील अशा सामाजिक राजकीय संघटना विचारवंत बुद्धिजीवी यांची बैठक आयोजित करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली. राज ठाकरे यांचा हा कार्यक्रम शुद्ध राजकीय असून कुठल्याही परिस्थितीमध्ये नागपूरची शांतता कायम ठेवा अशी विनंती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.