Home नागपूर ज्येष्ठ नाटककार प्रभाकर दुपारे भास्कर सुमन पुरस्काराने सम्मानित;

ज्येष्ठ नाटककार प्रभाकर दुपारे भास्कर सुमन पुरस्काराने सम्मानित;

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

नागपूर :
मराठीचे ज्येष्ठ नाटककार प्रभाकर दुपारे व कवयित्री डॉ. ज्योती नागपूरकर, तसेच हिंदीचे साहित्यिक डॉ. बालक्रिष्णा महाजन व डॉ. क्रिष्णकुमार द्विवेदी यांना पहिला राष्ट्रीय महाकवी भास्कर सुमन ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अक्षर फौंडेशन ट्रस्ट आणि मूकनायक इंडिया टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतिशेष अँड. श्याम मेश्राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी सीताबर्डी येथील हिंदी मोरभवन येथे सायंकाळी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी पाहुणे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम, मुंबई विद्यापीठातील प्रा.मंगेश बन्सोड, सामाजिक कार्यकर्त्या लता उमाकांत ढोक, सविता मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल, श्रीफळ देऊन साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पाहुणे सचिदानंद फुलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच याप्रसंगी अतिथींनी, हा पुरस्कार बुद्धिवंतांना मिळत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक भास्कर सुमन यांनी केले. संचालन ऋतुषा अवतारे यांनी प्रमोद रामटेके यांनी केले आभार मानले.