Home नागपूर माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितपहिले...

माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितपहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन दिनांक 17 आणि 18 एप्रिल 2022 ला मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे अतिशय थाटात संपन्न झाले.

24 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितपहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन दिनांक 17 आणि 18 एप्रिल 2022  ला मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे अतिशय थाटात संपन्न झाले. उदघाटन सत्रापासून समारोप सत्रा पर्यंत नऊ सत्रांमध्ये संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात परिसंवाद,कविसंमेलन ,
कथाकथन अशा विविधसत्रां सह एक गाजलेले आगळेवेगळे सत्र म्हणजे “अभिरूप न्यायालय” होय.
अभिरूप न्यायालय
मध्ये या साहित्य संमेलनाच्या मुख्य आयोजिका, साहित्यिक आणि ‘पोरी जरा जपून’ फेम, सुपरीचीत, सुप्रसिद्ध मा. विजया मारोतकर यांच्यावर खटला  भरण्यात आला. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.आपल्या वरील प्रश्नाची त्यांनी सफाईदार उत्तरे देताना एकूणच अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या साहित्यिकांची बाजू समर्थपणे मांडली. एक स्त्री, एक आई, एक बाई, एक साहित्यिक, एक समुपदेशक या नात्याने प्रत्येक भूमिकेवर न्यायालयामार्फत झालेल्या आरोपांचे खंडन केले .
यामध्ये न्यायाधीशांच्या भूमिकेत मंगेश बावसे, वकिलाच्या भूमिकेत मंजुषा कौटकर ,मदतनिसाच्या भूमिकेत विशाल देवतळे तर ऑर्डरली च्या भूमिकेत डॉ.माधव शोभणे,
मंजुषा कऊटकर यांनी आपल्या अभिनयपूर्ण शैलीत वकिलाच्या भूमिकेतून त्यांना अनेक प्रश्न विचारले.ज्यात त्यांचे कथा, कविता, कादंबरी,वैचारिक व चरित्रलेखन असे विविधांगी लेखन, पोरी जरा जपून या कार्यक्रमाचे  महाराष्ट्रभर भ्रमंती करत 301 प्रयोगाचे सादरीकरण, नोकरीच्या कालखंडात राखता आलेले  लेखन सातत्य,  नोकरीला न्याय देताआला या बाबत चे उत्तर , विविध संस्थांशी असलेले संबंध, तुम्हाला पुरस्कार आणि सन्मानाची हाव आहे म्हणून अशा धावता का.? यात घराकडे दुर्लक्ष होत नाही का?असे विविध प्रश्न होते.नोकरी,घर,आता माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान ,या साहित्यिक संस्थेची स्थापना आणि आता या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन या विषयांभोवती फिरणारे अनेक आरोप त्यांच्यावर केल्या गेले.आपल्यावरील आरोपांचे अतिशय संयमाने, खुबीने खंडण  करताना त्यांनी सभागृहाला कधी हसविले तर कधी  रडविले सुध्दा. मा.विजयाताची  रंगतदार प्रश्नांना बहारदार उत्तर मिळून उत्तरोत्तर अभिरूप न्यायालय रंगतच केले संपूर्ण सभागृहात खसखस पिकत गेली प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिला .साहित्य संमेलनाचा मंच कधी नाट्यात परिवर्तीत झाला, कळलेच नाही
आणि मदतनीस म्हणून विशाल देवतळे, वकिलाच्या भूमिकेत असलेल्या मंजुषा कौटकर आणि न्यायाधीशांच्या भूमिकेत असलेल्या मंगेश बावसे यांनी वेगळीच रंगत आणली ऑर्डरली
च्या वेशभूषेत आणि भूमिकेत असलेले डॉ. माधव शोभणे या अभिरूप न्यायालयाचे वेगळेच आकर्षण होते.
   न्यायाधीश वकील सर्वांची वेशभूषा यामुळे अक्षरशः न्यायालयातच आपण बसलो आहोत की काय असे प्रत्येकाला वाटत होते. शेवटी  न्यायाधिशांनी सर्व आरोपांचा परामर्श करून आरोपी विजया मारोतकर यांना शिक्षा दिली…      आपण आज पर्यंत नाट्यलेखन केले नाही ते करावे तसेच यापुढेही असेच राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करावे .
खुमासदार पद्धतीने हे सत्र प्रचंड रंगतदार झाले याची सर्वत्र चर्चा आहे.
या देखण्या सत्राचे सुत्रसंचालन  माया दुबळे मानकर यांनी केले तर आभार पल्लवी उमरे  यांनी मानले.