Home सामाजिक आमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षतेत उपविभागीय कार्यालय येथे पार पडली आढावा बैठक.

आमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षतेत उपविभागीय कार्यालय येथे पार पडली आढावा बैठक.

19 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

 दिनांक 13/04/2022 रोज बुधवार ला उपविभागीय कार्यालय उमरेड येथे आमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यातील समस्यावर आढावा बैठक पार पडली.
कित्तेक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या उमरेड नगरपरिषद अंतर्गत जमिनीचे पट्टे मोजणीचे कार्य  थांबले होते.
 भूमिअभिलेख कार्यालय अधिकारी सेलोकर यांना उमरेड नगरपरिषद प्रशासक चंद्रकांत खंडाईत व मुख्यधिकारी बल्लाळ यांचा उपस्थित शहरातील पट्टे मोजण्याकरिता 5 लक्ष रुपयेचा धनादेश नगरपरिषद याचा कडून देण्यात आले.
सर्वानसाठी घरे या घरकुल योजने करीता कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यातील काय अडचणी व सध्या स्तिथी आहे हे विचारण्यात आले.
रानबोळी या गावाला महसूल दर्जा मिळावा यावर चर्चा करण्यात आली. तसेच पुनर्वसन भागातील कामे VIDC ने लवकरात लवकर करावे असे आदेश दिले. तशेच वनहक्कचे पट्टे लवकरात लवकर कसे देता येईल या वर वन विभागातील अधिकारी यांचाशी चर्चा केली.
या वेळी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार पुंडेकर, नायब तहसीलदार अंबादे, राठोड, गटविकास अधिकारी माने, हिरुटकर, तेलंग, मुखधिकारी बल्लाळ, PWD टाकसांडे, सर्वशिक्षा अभियान चे वाघमारे, वनविभाग पंचबुधे, Vidc पुनर्वसन मानवटकर, वंजारी, येनुलकर जि.प. सदस्य अरुण हटवार, संदीप खानोरकर, राजू कुकडे, राजू कुथे, अज्ञान चोपकर तसेच नागरिक उपस्थित होते.