Home नागपूर रामदासपेठ – धरमपेठ नागरिक महिला मंडळाच्या वतीने अपंग व्यक्तींचा गौरव साजरा;

रामदासपेठ – धरमपेठ नागरिक महिला मंडळाच्या वतीने अपंग व्यक्तींचा गौरव साजरा;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

रामदासपेठ-धरमपेठ नागरिक महिला मंडळ व भाजपा अनुसुचित जाती मोर्चा
(पश्चिम नागपूर) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अंपग व्यक्तिंचा गौरव करून साजरी करण्यात आला. डॉ.बाबासाहेब दिन दुबळ्या आणि समाजाचे कैवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम, रामदासपेठ, धरमपेठ नागरीक महिला मंडळा आणि भाजपा अनुसुचित जाती मोर्चा (पश्चिम नागपूर) तर्फे एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अपंग व्यक्ति व्हिल चेअरच्या शिवाय चालू फिरू शकत नाही अश्या व्यक्तिंना सहभागी करून प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ सह भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत आयोजकांद्वारे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांनी आपल्या संबोधनात सांगीतले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिन दुबळ्या आणि सर्व समाजाचे कैवारी होते, डॉ. बाबासाहेबांनी जगातील सर्वात उत्कृष्ठ संविधान लिहून सर्व समाजाला न्याय मिळवून दिला. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजकां द्वारे अपंग व्यक्ति जे व्हिल चेअर शिवाय चालू शकत नाही तरी सुद्धा ते आपल्या जीवन जगण्यासाठी संघर्ष करतात अश्या व्यक्तिंचा सन्मान करणे म्हणजेच बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून कार्य करण्याच्या उपक्रमाची प्रशंसा केली. तसेच सिताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अतुल सबनिस यांची या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिती होती. ना.सू.प्र.चे ट्रस्टी व माजी नगरसेवक संजय बंगाले यांनी आपल्या उदबोधनात म्हटले की लंडन येथे उच्च शिक्षण घेत असतांना बाबासाहेब ज्या ठिकाणी राहीले ते ठिकाण जेव्हा निलामी करीता काढण्यात आले. ते महाराष्ट्र सरकार द्वारे विकत घेण्याकरीता तसेच इंदु मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळवून देण्याकरीता तेव्हाचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या योगदानाची भुमिका मांडली. माजी नगरसेवक सुनिल हिरणवार यांनी बाबासाहेबांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकून
बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी वरिष्ठ दिव्यांग समाज सेवक नामदेवराव यादवराव बलगर यांनी दिव्यांगाच्या समस्यां बद्दल माहिती दिली. यावर माजी नगरसेविका रुपा राय यांनी अपंग व्यक्तिंच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटी बद्ध राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला मोगर साहेब हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची रुपरेषा स्मृती राघव यांनी प्रस्तुत केली. यापुढे ही असेच समाज उपयोगी उपक्रम राबवून महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला सेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बरखा सोंगले, स्मृती राघव, शामला नायडू, सुनिता पाटील, शशिकला बावणे, नंदा कर्णेवार, विलास मंडारे, प्रकाश वर्मा, वैशाली इंगळे, अनिता चिकाटे, अनु उईके, नंदकिशोर भाऊ, कृष्णा भाऊ, तसेच अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजक सुनिता पाटील यांनी संचालन करून जयंती उत्सवात नव चैतन्य निर्माण केले. तर बरखा सोंगलेनी आभार मानले.