Home नागपूर उपयुक्त नोटीस रेल्वे प्रशासनाने रद्द करावी व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटण्यासाठी मार्ग...

उपयुक्त नोटीस रेल्वे प्रशासनाने रद्द करावी व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटण्यासाठी मार्ग प्रशस्त करून द्यावा अशी भावी पट्टी धारक यांच्या मार्फत मागणी;

19 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

मौजा, जातरोडी अंतर्गत इमामवाडा या परिसरात दिनांक. 7/4/ 2022 रोजी रेल्वे परिमंडल नागपूर यांच्या मार्फत जमीन मालकी संबंधित नागरिकांनी रेल्वे कोर्टासमोर दिनांक 18/4/022 रोजी ११ वाजता. उपस्थित राहण्याची नोटीस त्यांच्या मार्फत देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दि . 18/4/2022 रोजी सकाळी 11, वा . एडवोकेट गौतम बागडे यांच्यामार्फत वकील पत्र करून इमामवाडा कापला ईस्ट इंदिरानगर येथील नागरिक उपस्थित झाले. परंतु रेल्वे ट्रीमीनल कोर्ट चे अधिकारी हे नसल्या कारणामुळे वकिलामार्फत पुढील तारीख देण्याचे पत्र सादर केले गेले. मौजा जाटरोडी खसरा नंबर 4, 7, 27/2 मॉडेल मिल वापरासाठी उपलब्ध करून दिलेली जागा ही रेल्वे प्रशासनाची नसून भोगवटदार मालकीयत सरकार असे नोंद दिसून येते. या कारने उपयुक्त नोटीस रेल्वे प्रशासनाने रद्द करावी व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटण्यासाठी मार्ग प्रशस्त करून द्यावा अशी भावी पट्टी धारक यांच्या मार्फत मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी मित्र लोक गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक दिगंबर बागडे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने सामजिक कार्यकर्ते ओपुल तामगाडगे, विजय चिंचखेडे, बंडू बहादुरे, गरीबदास कांबळे, नितीन फुलमाळी, प्रफुल बहादुरे, प्रेम निकोसे, मुकेश वाघमारे, सुशील मेश्राम अरविंद मेश्राम, संदीप गजघाटे, संजय शेंडे ताराबाई म्हैसकर, गायत्री चौधरी, पिंटू बागडे, कमल कांबळे रंजना गोटे करून, पुडंलिक मों विद्या बनसोड, सचिन हातमोडे, पुरण घोटेकर, जीतू पाटील, कल्पना रंगारी, किरण वाळके अशा एकूण 45 च्या वर परिवारांना पहिल्या टप्प्यात रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावली यापैकी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व आपल्या हक्कासाठी न्याय मागत होते.