Home नागपूर समाजभान’ वाढविणारी बुद्धीबळ स्पर्धा संपन्न!

समाजभान’ वाढविणारी बुद्धीबळ स्पर्धा संपन्न!

20 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

आशादीप अपंग, महिला बाल विकास संस्था, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊन आणि विदर्भ संशोधन मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीबाधित दिव्यांग आणि डोळस व्यक्ती यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन नुकत्याच झालेल्या रविवारी करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेचे उदघाटन IPDG रोटरेरियन शब्बीर शकिर यांचे हस्ते झाले. त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने  विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी सर्वाना यातून उत्तम व्यक्तिमत्त्व विकास साधा.यासाठी शुभेच्छा दिल्या. विदर्भ संशोधन मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी दिव्यांगस्नेही उपक्रमात वेळोवेळी सहकार्य करून त्यांचा विश्वास वाढवताना आम्हाला आनंद होत आहे असे सांगून सर्वाना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे जेष्ठ सल्लागार लालासाहेब पाटील यांनी आशादीपच्या सर्व कार्यकारिणी चमुचे अभिनंदन करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. चेस असोसिएशन नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष सच्चिदानंद सोमण यांनी दृष्टीबधित दिव्यांग आणि डोळस यांना एकमेकांशी उत्तमरित्या खेळता यावे यासाठी उपयुक्त सूचना देऊन खेळास प्रारंभ केला. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक, संचालन व आभार संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी केले. स्पर्धेसाठी प्रत्येकी ४ खेळाडू असणारे ४ गट दृष्टीबधित आणि ४ गट डोळस असे करण्यात आले होते आणि त्यांचे ४ राऊंड फेऱ्यांमध्ये सामने झाले. ज्या स्पर्धकांना टीम मध्ये घेता आले नाही, त्यांनां ही उपस्थित प्रेक्षक आणि चेस असोसिएशन नागपूरच्या अनुभवी डोळस खेळाडू बरोबर खेळण्याची संधी देण्यात आली या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे वयोगट 10 वर्ष ते 78 वर्षे अशी खास उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी सर्वच स्पर्धकासाठी खास ब्रेल प्रमाणपत्रे बनविण्यात आली  होती. दुपारी 4 वा. प्रमुख अतिथी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित विजय मुनीश्वर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर विजय मुनीश्वर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा शास्त्री, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाउन टाऊनचे अध्यक्ष डॉ. हृषीकेशजी मायी, नागपूर सक्षमचे शिरीशजी दारव्हेकर उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय डॉ संगीता भोयर यांनी करून दिला आणी स्पर्धेचा अहवाल आणि निकाल सहसचिव सुप्रिया केकतपुरे यांनी  सादर केला .
दृष्टीबाधित गट विजेता
लुई ब्रेल टीम-
ज्ञानीराम, तिजन, सौरभ व सचिन
उपविजेता शुभांगी, मृणाली, किरण व अभिषेक डोळस गट
विजेता
व्हेटरन टीम शामकुंवर, बरहानपुरे, अगस्ती व बहादुरे
उपविजेता ज्युनियर टीम
दीप, प्रथमेश आरव व सप्तक
या शिवाय प्रत्येक बोर्ड वरील सर्वोत्तम दृष्टिबाधीत आणि डोळस गटातून खालील. पारितोषिके देण्यात आली
बोर्ड १ तिजन व शामकुंवर
बोर्ड २ ग्यानिराम आणि बरहानपुरे
बोर्ड ३ सौरभ व अगस्ती
बोर्ड ४ राजेश व बहादुरे या शिवाय  सर्वोत्तम अंध महिला खेळाडू, वयाने सर्वात ज्येष्ठ व सर्वात लन खेळाडूंनाही विशेष पारितोषिके देण्यात आले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. हृषीकेशजी मायी म्हणाले मी नेत्रतज्ञ असल्याने माझा दृष्टीबधितांशी नेहमीच संपर्क येतो, त्यांच्या भावना व समस्या मला माहिती असल्याने माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ही स्पर्धा घेण्याची माझी इच्छा होती, तुमच्या सर्वांच्या उत्साही सहभागाने आनंद होत आहे असे ते म्हणाले. विजय मुनीश्वर यांनी खेळाडूंच्या जीवनात योगाचे खूप महत्त्व आहे, सर्वांनी योगिक जीवनशैलीचा अवलंब करावा असे आवाहन केले. आणि त्यांच्या जीवनातील त्यांच्या आईचे, जनार्दन स्वामींचे आणि अनुशासित जीवनशैलीचे महत्त्व सांगून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आणि सर्व खेळाडूंना सतत प्रयत्नशील राहून विजयच्या दिशेने वाटचाल करत राहण्यासाठी प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या. शिरिषजी दारव्हेकरांनी सर्वांचे अभिनंदन करून आपल्या रेडिओ अक्ष विषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.प्रतिमा शास्त्री यांनी अध्यक्षीय समारोपात सर्वांचे अभिनंदन करून या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनाची भूमिका विशद केली. संपूर्ण स्पर्धा चेस असोसिएशन नागपूरच्या सहकार्याने पार पडली. सच्चिदानंद सोमण आणि भूषण श्रीवास यांच्यासह सर्व चमूने बहुमोल कामगिरी केली. तसेच रोट्रॅक्ट कमुनिटी चमुचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ नागपूर डाउनटाउन तर्फे गरजू अंध व्यक्तींना पांढऱ्या काठी चे वाटप करण्यात आले.संचालन संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊनचे सचिव अभिजित ठाकरे यांनी केले.