Home नागपूर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आज पासूनविशेष जनजागृती कार्यक्रम माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आज पासूनविशेष जनजागृती कार्यक्रम माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्याक्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम;

12 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर, पी. डब्लू.एस. महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक 21 आणि 22 एप्रिल 2022 रोजी कामठी मार्गावरील पी.डब्लू.एस. महाविद्यालया परिसरात  दोन दिवसीय विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  रांगोळी स्पंर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात  आहे. दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी मुख्य समारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर यांच्याद्वारे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.