Home नागपूर भारतीय राजस्व सेवेतील 75 व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे 13 एप्रिल रोजी...

भारतीय राजस्व सेवेतील 75 व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचे 13 एप्रिल रोजी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे होणार उद्घाटन केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या राजस्व विभागाचे सचिव तरुण बजाज यांच्या हस्ते होणार उद्घाटन;

15 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित  राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये उद्या 13 एप्रिल   2022 रोजी सायंकाळी 4  वाजता भारतीय राजस्व सेवेतील तसेच रॉयल भुटान सर्विस मधील अधिकाऱ्यांच्या 75 व्या तुकडीचे प्रवेश प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या राजस्व विभागाचे सचिव तरुण बजाज यांच्या हस्ते  . या प्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे . बी .महापात्रा तसेच  प्रशासन आणि फेसलेस योजना विभागाच्या सदस्या श्रीमती अनुजा सारंगी यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित .

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर द्वारे भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते .या अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून केल्या जाते .थेट भरती होणाऱ्या या भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कर्तव्यावर पाठवण्यापूर्वी  16 महिन्याच्या प्रवेश प्रशिक्षणातून जावे लागते .

यांना प्रशिक्षणादरम्यान कर प्रशासनातील विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते .यामध्ये कर कायदे , न्यायशास्त्राच्या संबंधित कायदे तसेच व्यापार कायदे याबाबत विशेष प्रशिक्षण दिल्या जाते .  यासोबतच हे  अधिकारी लेखा तसेच लेखाप्रणाली संदर्भात सखोल प्रशिक्षण प्राप्त करतात . कर चोरी तसेच पैशाचे गैरव्यवहार या आर्थिक गुन्ह्यांबद्दलचे तपास आणि विश्लेषण यासाठी प्रशिक्षणार्थींना  सायबर फॉरेन्सिक संदर्भात प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी करदात्यांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात यासाठी त्यांना संवेदनशील बनवले जाते  तसेच आयकर विभागाचे विविध क्षेत्रीय कार्यालय कार्यालय , संसद , रिझर्व बँक ऑफ इंडिया , सेबी तसेच एनएसडीएल या सोबतच विविध संवैधानिक संस्थांना   प्रशिक्षणादरम्यान भेट  आयोजित केली जातात . हे  प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करत सहाय्यक आयुक्त या पदी त्यांची नेमणुक होते  .  राजस्व  सेवेतील अधिकारी  करअनुपालनात   महत्वाची भूमिका बजावत असून त्यांचे राष्ट्रनिर्माणामध्ये  महत्त्वाचे योगदान असते .