Home नागपूर नागपूर जिल्हा ग्रामीण युवक युवती कार्यकर्ता संमेलन;

नागपूर जिल्हा ग्रामीण युवक युवती कार्यकर्ता संमेलन;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा (ग्रामीण ) युवक कार्यकारणी च्यावतीने गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी ९ वाजता. युवक-युवती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्ष व सचिव अखिल भारतीय मराठा महासंघाचे नागपूर जिल्ह्य युवकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम श्री दत्ता मेघे ऑडिटोरियम वाईसीसीई कॉलेज, हिंगना नागपुर येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी नागपूर जिल्हा ग्रामीण युवक युवती कार्यकर्ता संमेलनाचे कार्यक्रम, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकराव पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. उद्घाटक श्रीमंत राजे भोसले यांच्या हस्ते होईल. यावेळी मार्गदर्शन राजेंद्र कोंढरे करणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पाहुणे नरेंद्र पाटील, प्रकाश देशमुख, मनोहर कबले, अतिश गायकवाड यांची उपस्थिती राहतील. तरी या संमेलनाला विदर्भातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.