Home नागपूर नागपूर महानगर व नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभ.

नागपूर महानगर व नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभ.

19 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर शहरा च्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत राष्ट्रीय अध्यक्ष मा.अँड. शशिकांतजी पवार यांचे नगरीत आगमन.
अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर महानगर व नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभ येत्या 14 एप्रील 2022 रोजी, सायंकाळी 6 वाजता. शिवाजी सभागृह, दत्तात्रय नगर, बसवेश्वर पुतळ्याजवळ न्यू सुभेदार रोड नागपूर येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून या समारंभास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अड. शशिकांतजी पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस संभाजी राजे दहातोंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रंजीतदादा जगताप व इतर राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती नागपूर महानगरचे अध्यक्ष दिलीप धंन्द्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.