Home नागपूर 17 व 18 एप्रिल पासून पहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन.;

17 व 18 एप्रिल पासून पहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन.;

12 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

17 व 18 एप्रिल पासून पहिले राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलन.
  पत्रपरिषद
मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह धनवटे नॅशनल कॉलेज कॉंग्रेस नगर नागपुर येथेसकाळी ९ वाजता. कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रपरिषद घेतेवेळी
विजया मारोतकर अध्यक्ष मायमराठी, विशाल देवतळे उपाध्यक्ष मायमराठी, डॉ.भारती खापेकर मराठी विभाग प्रमुख धनवटे कॉलेज, मंगेश बावसे सचिव मायमराठी, प्रभाकर तांडेकर मार्गदर्शक मायमराठी आणि माधव शोभणे कोषाध्यक्ष मायमराठी यांची मंचावरील उपस्थिती होती.
मायमराठी साहित्य संमेलन 17 व 18 पासून
नागपूर. दि. १२ एप्रील
धनवटे नॅशनल कॉलेज व मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार 17, व सोमवार 18 एप्रिल रोजी करण्यात आले आहे असे पत्रपरिषदेत सांगितले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख करतील. 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पुणे हे अध्यक्षस्थानी असतील. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.वा.ना. आंधळे व अमरावतीच्या सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. शोभाताई रोकडे प्रमुख अतिथी म्हणूण उपस्थित राहतील. श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. धनवटे नॅशनल कॉलेजच्या स्व. विमलताई देशमुख सभागृहात होणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध सत्रांचा समावेश राहणार आहे.