Home नागपूर 14 एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची...

14 एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी;

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

डॉ. आंबेडकर आदर्श विद्यार्थी’ मागणीची आर.टी.आय. कार्यालया दारे सुनावनी संपन्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी घोषीत करण्याचा मागणिवर मुख्यामंत्री कार्यालयातील आर.टी.आय. विभागातील मा. नारायण थिटे – डेप्युटि सेक्रेटरी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुनावणी दि.१२.०४.२२ ला दुपारी १२.०७ ला, खरे यांचे राहते घरी नागपूर येथे भ्रमण ध्वणीद्वारे संपन्न झाली आहे. सुनावणी दरम्यान मागणीचा उद्देश विचारला असता डी.यु.खरे यांनी सांगीतले की डॉ. आंबेडकर यांचा जन्म दि.१४/०४/१८९१ ला महू येथे झाला. बालपणा पासून शिक्षण घेत असतांना त्यांना जातियते मुळे अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही विपरीत परिस्थीत मार्ग काढून शिक्षण सुरू ठेऊन ज्ञान प्राप्त केले. प्रसंगी पाव आणि पाणी घेऊन १८ तास अभ्यास केला. परिस्थीतीने वर्गाच्या बाहेर बसण्याची वेळ आनली तरीही ज्ञान साधणेत एकाग्रतेने विजय मिळवून अनेक उच्च पदव्या संपादन केल्या. प्राप्त ज्ञानाने “भारतीय संवीधान” निर्माण करून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या तत्व मुल्यांनी नितीमान समाज .निर्मान करून एकात्मतेच्या धाग्यात गुंफण्याचा मार्ग आम्हाला दाखविला. म्हणून डॉ.आंबेडकर यांना आदर्श विद्यार्थी घोषित करून भावी पिढीतील विद्यार्थांना त्यांच्या विद्यार्थी जिवनापून प्रेरना मिळावी. म्हणजे ते सुध्दा आपल्या ज्ञानाने देशाच्या संर्वागिन विकासासाठी आपले अनमोल योगदाण देण्यासाठी उत्साहाने आणि सकारात्मक भावनेने कर्तव्य पार पाडतील. तसेच नैराश्य भावणेतुन जे विद्यार्थी चुकीचा मार्ग अवलंबतात तो न अवलंबता त्यांना ही यातुन जिवनातील संघर्शाची प्रेरना मिळेल. म्हणून मागाणी मुख्यमंत्री पृथ्विराज चौव्हान महाराष्ट्र यांना निवेदणा द्वारे २०११ ला केली गेली. दि.१४/०१/२२ ला माहीती अधिकार अधिनीयम २००५ अंतर्गत माहिती अधिकारी मुबंई यांना पत्राचार द्वारे माहिती देण्याची विनंती केली. उत्तर न मिळाल्याने ०३/०२/२२ ला अपिलीय अधिकारी मुबंई यांना कार्यवाहीची माहिती देण्या संदर्भात विनंती केली ०४/०४/२०२२ ला कार्यालया द्वारे आजची सुनावनी ठरल्याचे कळविण्यात आले होते. सुनावणीत मनोगत ऐकल्या नंतर अधिकारी महोदयानी मागणी योग्य आहे. म्हणून यास कार्यालयातील वरिष्ट स्थरावर पाठवण्यात येत असून याची माहीती आपणासही पत्राव्दारे देण्यात येईल. असे सांगण्यात आले. हे मागणिच्या पाठपुराव्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल आहे. असे पत्रकाद्वारे डी यु.खरे यांनी कळवीले आहे.