विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅराथॉन दौड समिती च्यावतीने दिनांक 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ डॉ.आंबेडकर मॅराथॉन दौड 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता संविधान चौक ते दिक्षाभूमी चित्रकला महाविद्यालय येथे संपन्न होईल. त्यानंतर बक्षिस वितरण समारोप कार्यक्रम संपन्न होईल. याप्रसंगी क्रीडामंत्री सुनील केदार, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. शुभांगी, मा. बबनराव तायवाडे, प्रा. विजय बारसे, नितीन सरदार, आमदार, मंत्री, प्रामुख्याने उपस्थित राहतील. समारंभाचे अध्यक्ष यशवंत तेलंग प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रम यशस्वीरित्या यशवंत तेलंग, योगेश ठाकरे, केवलदास टेंभेकर, सुरेश धमगाये, ADV त्रिशूल खोब्रागडे, मधुकर नारनवरे, समम्येक तेलंग, भास्कर सूर्यवंशी हे सर्व परिश्रम घेत आहेत.

