Home नागपूर गार्डन कोर्ट सोसायटीत रंगला अनोखा कार्यक्रम;

गार्डन कोर्ट सोसायटीत रंगला अनोखा कार्यक्रम;

47 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

अपत्यांचा कल पालकांनी ओळखणे 
सर्वात महत्त्वाचे : विवेक वाघ
गार्डन कोर्ट सोसायटीत रंगला अनोखा कार्यक्रम
नागपूर : आपल्या मुलामुलीचा कल कोणत्या विषयाकडे आहे हे हेरून प्रोत्साहन दिले गेले तर उत्तम व्यक्तिमत्त्व घडविणे सोपे जाते, असा सल्ला प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ विवेक वाघ यांनी पालकांना दिला आहे.बेलतरोडीतील गार्डन कोर्ट सोसायटीमधील शाळकरी मुलामुलींच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. इंटरनँशनल मँथमेटिक आँलिम्पियाड मध्ये 40 पैकी 38 गुण घेणारी(इंटरनँशनल रैंक 6908, नँशनल रैंक 2999) पुण्याची अकिरा वैभव कुळकर्णी हिच्या यशाचे निमित्त करून हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. गार्डन कोर्टचे रहिवासी पत्रकार विनोद देशमुख आणि गायिका अरुंधती देशमुख यांची अकिरा ही नात आहे.यशापेक्षा अपयशांची संख्या नेहमीच जास्त असते. त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका आणि निराश होऊ नका, असे आवर्जून सांगत वाघ यांनी इंटरनँशनल आँलिम्पियाड सह इतरही स्पर्धा परीक्षांची माहिती दिली आणि नंतर अनेकांच्या शंकांचे निरसनही केले. अकिराची आई गार्गी कुळकर्णी यांनीही आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत गौतमी यांनी, तर संचालन अजय कनोजे यांनी केले. अकिराचे स्वागत नमीश श्रीवास्तवने आणि गार्गीचे स्वागत प्रिया अग्रवाल यांनी केले. सोसायटीतील सर्व बालगोपालांसह त्यांच्या मातापित्यांनी या उपक्रमाला उत्साही प्रतिसाद दिला. तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव आणि डॉ. मीना निमदेव यावेळी आवर्जून उपस्थित होते.
फोटो-
1. अकिराचे स्वागत करताना नमीश श्रीवास्तव
2. गार्गी कुळकर्णी अनुभव सांगताना
3. विवेक वाघ मार्गदर्शन करताना
4. उपस्थित विद्यार्थी आणि पालक