Home नागपूर चंद्रशेखर क्षेत्रपाल दादा यांच्या निवासस्थानी आर. विमला यांची अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थिती;

चंद्रशेखर क्षेत्रपाल दादा यांच्या निवासस्थानी आर. विमला यांची अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थिती;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

चंद्रशेखर क्षेत्रपाल दादा यांच्या निवासस्थानी गण गण गणात बोते अभूतपूर्व सोहळा संपन्न.*
निर्बंध मुक्तीची आदेश मिळाल्या नंतरच दरवर्षीप्रमाणे होणारा गुढीपाडव्याच्या दिवशी अभूतपूर्व सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडर वर्षाचा पहिला महिना. या महिन्यातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाच्या पहिला दिवस. अन् याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरूवात होते. साडेतिन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडवा हा हिंदु नववर्षाचा पहिला सण. या दिवसापासून अनेक ठिकाणी शुभकार्याची सुरूवात केली जाते. यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. आजच्या दिवशी हिंदू समाजात प्रत्येक घराच्या दर्शनी भागात किंवा घरावर गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी ही विजयाचे, समृध्दीचे प्रतिक मानले जाते.” गुढी “म्हणजे ” विजय ध्वज ”  आणि “पाडवा” म्हणजे प्रतिपदा तिथी. चैत्र नवरात्र, नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हरिपाठाचे नामस्मरणात आणि ह.भ.प. संतकवी दासगणू महाराज रचित श्री गजानन विजय ग्रंथाचे सहस्त्रदर्शनाचा लाभ असा हा अभूतपूर्व सोहळ्याचे वर्णन करायला शब्दात जागाच उरली नाही. क्षेत्रपाल दादांकडे सर्व माऊलींनी अनुभवला व समर्पित भावनेने सेवा दिली. रामायणाच्या काळातील संदर्भ लक्षात घेतला तर प्रभू रामचंद्र यांनी १४ वर्षाचा वनवास संपवून आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येत परतले होते. त्याच्या या आगमना प्रित्यर्थ अयोध्या मधील सर्वच  नागरिकांनी आपापल्या घरी गुढी उभारून श्री रामाचे आपल्या नगरीत स्वागत केले होते. नागपूर नगरीत झाले. तसाच गजानन भक्तांचा उत्साह व अमृतवेळेत लक्ष्मी-नारायणाचा रुपात महाआरतीच्या प्रारंभी दादांची मुलगी व जावायांना पाहून दादांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होत्या. त्या प्रसंगाचे वर्णन काय करावे स्वत: श्री गजानन महाराजांनी हा योगायोग घडवून आणला याचा अनुभव प्रत्यक्ष भक्त मंडळी अनुभवत होती. गुढीपाडव्याच्या दिवसापासून श्री राम जन्मोत्सवाची सुरुवात होऊन रामनवमी ला रामजन्म केला जातो. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात अनेकांच्या घरी रामाचे नवरात्र राहते. हा अनेकांकडे हे नवरात्र कुळाचार असतो. मराठी भाषीक लोकांसाठी गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याकाळात अनेक विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव हा प्रत्येक हिंदूंच्या उत्साहात भर टाकतो. त्यामुळे  महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वा जिथे जिथे हिंदू आहेत त्या सर्वच ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन, हरिपाठ व महाआरतीचे आयोजन दादांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. कलियुगामध्ये षड्रिपूग्रस्त मानवाचा अहंकार वाढेल. महत्वाकांक्षा वाढून जगात अकारण युद्धही होतील. समाजात सतत समस्या उध्द्ववतील. अविश्वास कळस गाठेल. ज्ञात अज्ञात संकटाने मानवी मन अशांत असेल हे कलियुगात ठरलेलेच होते. अशावेळी लोकांना सद्बुद्धी देत सन्मार्ग दाखवून उद्धार करण्यासाठी श्री महादेवांनी अवतार धारण केले.  विज्ञानाच्या मानवी कल्पनेच्या पलिकडे असणारी अशक्य ते शक्य करुन दाखवणारी परमेश्वरी शक्ती म्हणजे महादेव अवतार शेगांवचे समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज. त्यांनी समाजात श्रद्धा विश्वास, भक्तीभावाची रुजवण केली. सद्बुद्धी प्रदान करुन आत्मविश्वास निर्माण केला. जीवनात कल्पित अकल्पित परीक्षेच्यावेळी सामना करायला लोकांमध्ये कणखर मानसिकता निर्माण केली. समर्थांच्यावरच्या अढळ विश्वासाने भक्तीमुळे लोकांना अवघड परीक्षेचा सामना करता येवू लागला. भक्तांच्या मनातील भय दूर होत जीवनात आनंद निर्माण झाला. ‘श्री समर्थ गजानन महाराज भक्तांना या भवसागरी निःशंक होत निर्भयपणे जगण्याची हमी देतात. गण गण गणात बोते या सिध्दमंत्राच्या आश्वासनाने भक्तांच्या जीवनाला सुरक्षा कवच प्राप्त होते. करोडो भक्तांचे आश्रय स्थान असलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाचं सहत्रर्दशन आज गुढीपाडव्याच्या दिवशी संतकवी दासगणू महाराजांनी श्री गजानन चरणी अर्पण केला. आपण त्यांच्या चरणी भक्तीभावाने शरणागत होवू या. समर्थांवरच्या विश्वासाने निर्भय होत आपलेही जीवन उजळवू या असा संकल्प घेऊन चंद्रशेखर क्षेत्रपाल दादांनी विजयी पताका आपल्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमस्थळी चौफेर लावण्यात आल्या. नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन महाप्रसादाचा भक्तांनी आस्वाद घेतला.
या अभूतपूर्व सोहळ्यामधे हरिपाठ, महाआरती मिळावी व श्री गजानन महाराजांचे सुंदर रुप पहायला मिळावे. त्यांच्या दर्शनाने आमचे भाग्य उजळून निघावे त्याच बरोबर महाप्रसादाचा लाभ मिळावा. या उद्देशाने नागपूर नगरीचे भाग्यवंत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, गणमान्य, नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्रीमती आर. विमला,  जिल्हाधिकारी महाज्योती नागपूरचे प्रवीण डांगेजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर सुधार प्रन्यास नागपूरचे मा. निशिकांत सुके, अतिरिक्त जिल्हाधिकारी मिहान नागपुरचे मा. प्रकाश पाटील,  निवासी उपजिल्हाधिकारी नागपूरच्या श्रीमती विजया बनकर, नागपूर उपजिल्हाधिकारी श्रीमती सुजाता गंधे, सोलर इंडिया लिमिटेडचे जनरल मँनेजर मुंधडा आणि इतर मान्यवर अधिकारीगण, गनमान्य नागरिकांनी, भक्तांनी उपस्थित राहून माहाप्रसादाचा आनंद घेतला. लवकुश नगरीत सर्वत्र भगवा ध्वज लावून गुढी उभारण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसर गजाननमय झाली. धार्मिक वातावरणात अभूतपूर्व गुढीपाडव्याच्या सोहळा संपन्न झाला.