Home नागपूर महाकल्प आर्टिस्ट अकादमीचे समुह कला प्रदर्शन;

महाकल्प आर्टिस्ट अकादमीचे समुह कला प्रदर्शन;

16 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

४ एप्रिल २०२२
महाकल्प आर्टिस्ट अकादमीचे समुह कला प्रदर्शन –
 “आपण ऐकलत का शहर काय बोलतय !”
“काळ वेळ विसरुन समर्पित भावनेने चित्रकारांची चित्र निर्मिती होत असते. त्यांची कदर व्हायला हवी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे”, अशी भावना माननीय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. निमित्त होते महाकल्प आर्टिस्ट अकादमी व चिटणीस सेंटर, नागपूर द्वारा आयोजित “आपण ऐकलत का शहर काय बोलतय !” या वैदर्भीय कलावंतांच्या समुह कला प्रदर्शनाच्या समुह प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे या प्रदर्शनाचे शनिवार दि.२ एप्रिलला सायंकाळी ४.३० वा. नितीनजींच्या हस्ते उदघाटन झाले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की एकदा चित्रपट अभिनेता सलमान खान याने मला एक पेंटींग भेट दिली त्यावेळी तो म्हणाला की, हे पेन्टींग पूर्ण करण्यास रात्रीचे साडेचार वाजले होते. यावरुन लक्षात येते की कला निर्मितीत कलाकारांचे किती समर्पण असते. परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्यांना अपेक्षित प्रोत्साहन मिळत नाही. कलावंतांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्याची, त्या विकण्याची संधी मिळायला हवी. त्यादृष्टीने सुरेश भट सभागृहाच्या खालच्या भागात कलादालनाची निर्मिती करता येईल. महाकल्प आर्टिस्ट अकादमीने जबाबदारी घ्यावी. तेथे चित्रकारांना निःशुल्क चित्रे प्रदर्शित करता येतील आणि त्या विकल्या गेल्यास दहा टक्के रक्कम त्यांनी नगर पालिकेस द्यावी. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. कार्यक्रमास कलारसिकांनी गर्दी केली होती. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रो-चान्सलर, दत्ता मेघे इन्स्टिटुट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा, आणि उद्योजक व आर्टिस्ट विलास काळे यांनीही आपले विचार व्यक्त केले आणि सहभागी कलावंतांचे कौतुक केले. नवोदित कलावंतांना प्रोत्साहित करणारे, त्यांना योग्य नवी दिशा देणारे एक सर्वव्यापक ललित कला केंद्र नागपुरात असावे या उद्देशाने नागपुरातील ज्येष्ठ कलावंत प्रमोदबाबू रामटेके माजी आमदार दिनानाथ पडोळे यांच्यासारख्या अनेक वैदर्भीय ज्येष्ठ व नवोदित चित्रकार शिल्पकार मित्रांनी एकत्र ये स्थापन केलेल्या महाकल्प आर्टिस्ट अकादमी’ (मा) या संस्थेचे “आपण ऐकलत का शहर काय बोलतय !” हे पहिलेच समुह कला प्रदर्शन असून या प्रदर्शनात वास्तववादी शैलीची अभिजात आवड असणारे कलावंत आहेत, आपल्या विशिष्ट शैलीने ओळखले जाणारे अमुर्त शैलीत काम करणारे कलावंत आहेत तसेच, नव्या डिजिटल माध्यमातून आपले विचार व्यक्त करणारे कलावंतही आहेत. अरुण मोरघडे, प्रमोदबाबू रामटेके, दिवंगत सुधीर तलमले,चंद्रकांत बांगडे, गोपाल बेतावार, प्रकाश बेतावार, बिजय बिस्वाल, गणेश बोबडे, आशिष बोदडे, इशिता चौधरी, सदानंद चौधरी, विनोद चव्हाण, आनंद दाबली, भाऊ दांदडे, पंकज दवंडे, राजेन्द्र दुरुगकर, अब्दूल गफ्फार, शंकर गायधने, संजय गजर्लवार, जयंत गायकवाड, संजय जठार, विलास काळे, विनोद काटेकर, राजकुमार कावळे, मिलींद लिंबेकर, राजेंद्र मसराम, सुरेन्द्र मसराम, नाना मिसाळ, मुक्तादेवी मोहिते, सुरेश मून, रघू नेवरे, राजीव निमजे, विनायक नित्तुरकर, दिनानाथ पडोळे, प्रशांत फुसाटे, संजय पुंड, विनोद राऊत, शशिकांत रेवडे, शरद सहारे, गणेश तायडे, अशोक थारसेकर, हरीश वाळके,श्रीकांत वेखंडे जयंत मैराळ, असे एकुण ४५ कलावंत या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. यासर्व कलावंतांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या कलाकृतींना बघण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने कला रसिकांना लाभली आहे.
हे प्रदर्शन दि.५ एप्रिल २०२२ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. या शिवाय रविवार दि. ३ एप्रिलला सायं. ४.३० वा. प्रख्यात चित्रकार बिजय बिस्वाल यांचे निसर्ग चित्रणाचे, सोमवार, दि. ४ एप्रिल ला सायं. ४.३० वा. विनायक नित्तुरकर यांचे शिल्पकलेतील व्यक्तिचित्रणाचे, मंगळवार दि. ५ एप्रिलला प्रा.अब्दुल गफ्फार यांचे ऑईल कलर मधील व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक राहणार असून सोमवार, दि. ४ एप्रिल ला सायं. ४.३० वा. महाकवी सुधाकर गायधनी यांचे कला आणि सौदर्यावर व्याख्यान आयोजि केलेले आहे. विभिन्न शैलीतील कलाकृतींचा आनंद घ्यावा तसेच रोज सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केलेल्या प्रात्यक्षिकांचाही आस्वद घ्यावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोदबाबू रामटेके, उपाध्यक्ष दिनानाथ पडोळे आणिा सचिव
डॉ.भाऊ दांदडे यांनी केले आहे. डॉ. भाऊ दांदडे सचिव, महाकल्प आर्टिस्ट अकादमी, नागपूर आणि एका प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे