Home नागपूर शिवनिष्ठा फाउंडेशन च्या वतीने हर घर भगवा या उपक्रमाचे आयोजन संपन्न;

शिवनिष्ठा फाउंडेशन च्या वतीने हर घर भगवा या उपक्रमाचे आयोजन संपन्न;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

“वारकरी मंच नागपुर शहर” आणि ” शिवनिष्ठा फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्त (मराठी नवीन वर्ष) आयोजित केलेल्या हर_घर_भगवा, या उपक्रमाचे आयोजन दुबेनगर, महालक्ष्मी नगर, हुडकेश्वर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नाकर मुळीक सर, सौ. कांचनताई बेलखोडे तसेच शिवनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पोहनेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वारकरी मंच नागपुर जिल्हा अध्यक्ष मयुर रामदासजी वाजगे (MRW) नागपुर जिल्हा सचिव विनीत भिवगडे, शहराध्यक्ष दिनेश कांबळे, शहर सचिव मनिष ठवकर, युवराज बुरघाटे, कोषाध्यक्ष तेजस घोडे, हिमांशु हावरे, निशांत वानखेडे, नकुल पिंपळापुरे, मेहूल बेले, देवेंद्र राऊत, दुशांत जूनघरे, आयुष शर्मा, भावेश बुरीले, रोशन सातनुरकर, युगांत बिडकर, गौरव सावंत, अनिकेत निनावे, आदेश इंगोले, हिमांशु भिवगडे, रूद्रा चित्रीवेकर, प्रविण सावंत, रुपेश देवते, अनंतराव टोंगे ईत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते. आणि वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेश कोंडे देशमुख महाराज, आळंदीकर यांचे दिपक पोहनेकर यांनी आभार मानले.