Home नागपूर भारतीय नववर्ष स्वागत समिती च्यावतीने यंदाही गुढीपाडव्याला महिलांची स्कुटर रॅली निघणार*

भारतीय नववर्ष स्वागत समिती च्यावतीने यंदाही गुढीपाडव्याला महिलांची स्कुटर रॅली निघणार*

25 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

भारतीय नववर्ष गुढीपाडवा दिनांक २ एप्रिल २०२२ पासून प्रारंभ होत आहे. ते ५१२३ संपून ५१२४  सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नव वर्ष गुढीपाडवा निमित्त पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी 1 एप्रिल 2022 ला, इतवारी भागातील महिलांची वाहन रॅली निघणार आहे. ही वाहन रॅली आग्याराम देवी मंदिर येथून प्रारंभ होऊन विविध मार्गाने फिरून पोद्दाररेश्वर राम मंदिर येथे समाप्त होईल.
विविध महिलांच्या संस्था, संघटना व महिला बचत गट यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या वाहन रॅली करिता विवीध रूपाने सहकार्य करू शकता व तसे ते करावे ही विनंती केली आहे. महिलांच्या सहकार्यामुळे महिलांचा उत्साह वाढेल. महिलांची स्कूटर रॅली मार्ग खालील प्रमाणे 👉 प्रारंभ रॅलीला सायंकाळीं ४ वाजता आग्याराम देवी मंदिरापासून सुरुवात होईल. आग्याराम देवी मंदिर, मुळे पेट्रोल पंप, दत्त मंदीर, गणेशपेठ पोलीस स्टेशन चौक, मॉडेल मिल चौक, श्रद्धा फरसाण चौक, चिटणीस पार्क, पंडित बच्छराज व्यास चौक, बडकस चौक, गांधी पुतळा, शहीद चौक, पोद्दारेश्वर सीए रोड राम मंदिर येथे समापन होईल. असे माजी नगरसेविका तसेच माजी सभापती गांधीबाग झोनच्या सौ.श्रद्धा विजय पाठक यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
अधिक माहिती करिता श्रद्धा पाठक यांचा मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्यांचा संपर्क नंबर खालील प्रमाणे >9326426272