Home नागपूर मेडिकल रुग्णांना औषध उपलब्ध करामनसे;

मेडिकल रुग्णांना औषध उपलब्ध करामनसे;

36 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

 मनसेच्या शहराध्यक्षा मनिषा पापडकर यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन सादर करून मेडिकल रुग्णालय येथील येणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध करून देण्यास संबंधित निवेदन देण्यात आले. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना अद्यावत उपचार मिळावा म्हणून यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी सरकार कोट्यावधीची अनुदान देते परंतु खरेदीची जबाबदारी असलेल्या हापकिन कंपनीकडून वेळेवर खरेदी प्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलने मागील चार वर्षात  हापकिन कंपनीच्या तिजोरीत जवळपास 22 कोटी जमा केले होते. पण त्यातून केवळ 13 टक्के म्हणजे 3 कोटींची यंत्र खरेदी झाली आहे. औषधी व यंत्रसामुग्री खरेदीची केंद्रीकरण करण्याचा निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांना लागणारी यंत्रणा औषधी व साहित्य खरेदीची जबाबदारी 2017 मध्ये बायो फार्मासिटिकल कार्पोरेशन लिमिटेड कडे देण्यात आली होती. मात्र खरेदी प्रक्रिया कुठलाही अनुभव नसलेल्या हापकिन कडून सुरू असलेल्या 5 वर्षापासून गोंधळ अद्यापही कायम आहे. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल 2017 ते 18 या दरम्यान 3 कोटी 20 लाखाचा निधी हापपिन कडे वळता केला. परंतु त्यातून केवळ 1 कोटी 80 लाखांची यंत्राची खरेदी झाली . 2018 ते 19 या वर्षात 3 कोटी 75 लाखाचा निधी जमा करूनही 1 कोटी 56 लाखाची यंत्र खरेदी झाले. 2019 -20 या वर्षात 8 कोटी 71 लाख तर 2020 -21 व्या वर्षात 6 कोटी 7 लाख आपल्याकडे जमा करून यंत्रांची खरेदी झाली नाही. हापपिन कडे या चार वर्षातील 18 कोटी 94 लाख रुपये जमा आहे. नव्या आर्थिक वर्षात आणखी निधी जमा होईल. आत्तापर्यंत हापकिन कंपनीला देण्यात आलेल्या निधी बाबत लेखी अहवाल द्यावा. व हापकिन कंपनीला देण्यात आलेले टेंडर ची प्रत देण्यात यावी. सर्वसामान्य रुग्णांना औषधी खरेदीसाठी वणवण फिरावं लागतं व निधी असून सुद्धा हातीं कंपनी यंत्रसामुग्री रुग्णाला पुरवली जात नसेल तर अशा कंपनीला ब्लॅकलिस्ट करून देण्यात आलेली रक्कम परत घ्यावी. या विषयावर वैद्यकीय अधीक्षकांनी स्पष्टीकरण दिले की हापकिन कंपनीला आम्ही करोडो रुपये देऊन सुद्धा 2016 ते 2017 मध्ये आम्हाला यंत्र सामुग्री व औषध उपलब्ध करून दिली नाही. वारंवार पैसे देऊन सुद्धा आम्हाला सोयी उपलब्ध करून देण्यात येत नाही. आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हापकिन कंपनीला आदेश देऊन नागपूरातील मेडिकलमध्ये औषध वेळेवर पुरवावी. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना यासंबंधीत भेट घेणार आहे असेही मनिषा पापडकरने म्हटले. यावेळी विभाग अध्यक्ष मंजुषा पानबुडे, शहर उपाध्यक्ष पूनम चाडगे, शहर उपाध्यक्ष मनीषा पराड, शहर उपाध्यक्ष इंदिरा वाघमारे, पूर्व विभाग अध्यक्ष नंदा खोब्रागडे, विभाग सचिव दिपा चीरकुटे इत्यादींची उपस्थिती होती .