Home नागपूर आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने जागतीक महिला दिन साजरा.

आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने जागतीक महिला दिन साजरा.

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

नागपूर : २९ मार्च २२

आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्यावतीने रविवारी २७ मार्च रोजी भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात राष्ट्रभाषा साहित्य संघाच्या जागतीक महिला दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या ‘ मेरी आवाज ही पहचान है ! या संगीतसंध्याचा समारोप मोठ्या आनंदाने झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रीय संरक्षक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध तबलावादक डॉ. प्रशांत गायकवाड, सर्जन डॉ.नरेंद्र कोडावते आणि आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्या संचालिकाच्या अनिता मसराम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. “ही आमुची प्रार्थना हेच आमुचे” ही मराठी प्रार्थना केली. मागणे मनसाने मनाशी मनसासम वागणे..” अनिता मसराम आणि संपूर्ण ग्रुपने सुरुवात केली. हा संगीतमय आयोजित कार्यक्रमात भारतरत्न स्व.लता मंगेशकर आणि डिस्को किंग स्व.बप्पीदा लहिरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “मेरी आवाज ही पहचान है..” या कार्यक्रमाचे शीर्षक गीत अनिता मसराम आणि सतीश पुरकम यांनी गायले होते.  तसेच झुंड चित्रपटात माइकल ची भूमिका सकरणारे मायकल आणि मराठी मालिका “आई कुठे काय करते” चे नायक रासिकराज असवले यांच्या आई-वडिलांचे देखील सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. उरलेली रात्र, हे गाणे रेश्मा सातपुते यांनी बप्पीदा यांना समर्पित केले. भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून कीर्तिका मसराम आणि वंशिका फुले यांनी ‘आओ तुमसे चाँद पे ले जाये’ हे गीत सादर केले.  आकार मल्टीपर्पज फाऊंडेशनचे हे व्यासपीठ सर्व नवोदित कलाकारांना पहिले व्यासपीठ होते. सर्व नवोदित गायक: कीर्तिका मसराम, ७ वर्षांची चिमुकली कलाकार, ११ वर्षांची वंशिका फुले, संगीता फुले, रेश्मा सातपुते, डॉ. सुनील मेश्राम, डॉ. अरुण घायवत, डॉ. इंगोले, सतीश पुरकम आणि प्रफुल्ल पेंदाम व वादक : रवी माळवे, नागेश गेडाम, सुरेशजी, भूषणजी या सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.