Home सामाजिक राजू पारवे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला 853 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविकास...

राजू पारवे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला 853 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार मानले ;

29 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

24/03/2022 रोजी अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरती विधानसभेत बोलत असतांना गोसेखुर्द प्रकल्पाला 853 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार मानले तसेच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न लावून धरला.

मागच्या 20 वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या रोगजाराचा, पिण्याच्या पाण्याचा, पुनर्वसनाचा आणि अश्या अनेक प्रकारच्या प्रश्नांना आज सभागृहात वाचा फोडली.
तसेच माझ्या विधानसभा क्षेत्रातील थुटानबोरी सारख्या गावातील लोक मागच्या सहा वर्ष्यापासून विजेअभावी जिवन जगत असुन असंख्य हालअपेष्टा सहन करत आपला उदर्निवाह करित आहेत. ही गोष्ट सुद्धा निदर्शनास आणून दिली आणि या सर्व समस्यांवर लवकरात लवकर विचार होऊन त्यावर त्वरित उपाय योजना करण्याची अशी मागणी केली.