Home नागपूर मनपा मधील घोटाळ्याच्या तपासाचा व्याप वाढवा – आप;

मनपा मधील घोटाळ्याच्या तपासाचा व्याप वाढवा – आप;

20 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

*मनपा मधील घोटाळ्याच्या तपासाचा व्याप वाढवा – आप*

*पुलिस उपायुक्त श्री. अजय शिंदे, आर्थिक अपराध शाखा, नागपुर पोलिस यांना नागपूर महापालिकेतील घोटाळ्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवणे बाबत आम आदमी पार्टी तर्फे निवेदन*

पुलिस उपायुक्त श्री. अजय शिंदे, आर्थिक अपराध शाखा, नागपुर पोलिस यांना नागपूर महापालिकेतील घोटाळ्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवणे बाबत आम आदमी पार्टी महाराष्ट्र आय टी सेल अध्यक्ष अशोक मिश्रा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

मिश्रा यांनी सांगितले कि नागपूर महापालिकेतील घोटाळ्यांच्या तपासात आतापर्यंत केवळ लहान कर्मचाऱ्यांनाच अटक करण्यात आली आहे, तर एवढ्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये विभागप्रमुख तसेच अतिरिक्त आयुक्तांनाही वठणीवर आणण्यात आलेले नाही. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचा कार्यकाळ 3 वर्ष झाल्यावर त्यांची बदली झाली असतानाही त्यानी तो रद्द करुण पुन्हा आपल्या पदावर कायम आहेत यामुळे त्यांना नेत्याचे संरक्षण असल्याचे दिसून येते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने महानगरपालिकेला कोट्यवधींचा निधी दिला. परंतु, मनपाच्या आरोग्य विभागाने सरकारच्या अटी, शर्तींचा भंग करून कोरोना साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. यात मनपाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी असून, या प्रकरणी मनपा आयुक्त गप्प बसलेले आहेत. एसडीआरएफ आणि एनएचआरएम अंतर्गत मिळालेला अनुदान खर्च करण्यासाठी मार्गदर्शक सूचना असूनही शासन नियम धुडकावून कोरोना उपाययोजनेवर कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आलेली आहे.  मनपाचे तत्कालिन आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या  करण्यात आली आहे.  डॉ. संजय चिलकर आणि  डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या स्वाक्षर्‍या घेवून  नस्ती तयार करणारी व्यक्ती एकच असून त्याची कठोर तपासणी करणे गरजेचे आहे.

श्वान दंश लसीची नियमबाह्य खरेदी, खरेदी प्रस्ताव व कार्यादेशावर तारखेचा उल्लेख नाही तसेच जावक क्रमांक पण नाही, 2 हजार व्हिटीएम किट स्मित फार्मास्युटिकल नागपूर यांच्याकडून अधिक दराने खरेदी बाबत, पीपीई किट, ऑक्सिमीटर, पल्स मीटर खरेदीचे दर आणि शासनाच्या जेम्स पोर्टलवरील दरात मोठा फरक असल्याची कारणे, एसडीआरएफ व एनएचआरएम अनुदानात झालेल्या गैरव्यवहाराची बारकाईने तपासणी करण्यात यावी.

आप नागपूर सचिव भूषण ढाकुलकर यांनी सांगितले कि जुलै २०२० मध्येच मुंढेंनी राम जोशींकडून आरोग्य विभाग काढला होता तरी मागील  दीड वर्षांपासून राम जोशी हे आरोग्य विभागाच्या प्रत्येक बिलावर स्वाक्ष्री  कोणत्या अधिकाराने करीत होते. यानंतर आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशाने आरोग्य विभाग पुन्हा राम जोशींकडे का देण्यात आले, राम जोशींच्या मनपा मध्ये कार्यकाळात प्रत्येक व्यवहाराची चौकशी करावी, राम जोशीं कोणत्या नेत्या सोबत आणि ठेकेदार  यांच्या नेहमी संपर्कात आहे याचा तपास करून दोषींवर कार्यवाही करावी.

नागपूर महानगरपालिकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यात सहभागी अधिकारी, कंत्राटदार, राजकारणी यांची सखोल चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकून कोरोनाने त्रस्त जनतेकडून सावकार व्याज वसूल करणाऱ्यांना शिक्षा होईल तेव्हाच लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढेल अशी मागणी आप पार्टी तर्फे करण्यात आली.

यावेळी पश्चिम नागपूर अध्यक्ष आकाश कावळे, उत्तर नागपूर अध्यक्ष रोशन डोंगरे, ललित कटारिया, पुष्पाताई ढाबरे, कैलाश कावरे, गिरीश तितरमारे,  जॉय बांगडकर ,संजय लेंढारे, ललित कटारिया, हरजीत सिंग गरेवल प्रामुख्याने उपस्थित होते.