Home नागपूर गीत गायननांचा संगीतमय कार्यक्रम रविवारी;

गीत गायननांचा संगीतमय कार्यक्रम रविवारी;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

गीत गायननांचा संगीतमय कार्यक्रम रविवारी*
आकार मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि डिस्को किंग बप्पी लहरी यांना संगीतमय श्रद्धांजली देण्यात येईल. रविवारी 27 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता. भाऊसाहेब शेवाळकर हॉल, दुसरा मजला, साई सभागृहा जवळ शंकरनगर चौक नागपूर येथे रविवारी “मेरी आवाज ही पहचान है ” कार्यक्रम वूमन्स डे आणि होली स्पेशल यानिमित्ताने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रकाश गजभिये प्रमुख अतिथि पाहुणे म्हणून प्रामुख्याने उपस्थिती राहतील. राष्ट्रपती सन्मान प्राप्त वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर तबला आर्टिस्ट डॉ. प्रशांत गायकवाड यांची यावेळी उपस्थिती राहतील. तसेच विशेष आभार हिंगणघाटचे पोलीस पाटील – कल्पना उइके आणि डॉ. नरेंद्र कोडवते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गीत गायनांच्या यशस्वीरित्या सिंगर गायक -> रेशमा सातपुते, संगीता फुले, वंशिका फुले, वैशाली पाटील, सुनील मेश्राम, डॉ. अरुण घैवत, विजय इंगोले, सतिश पुरकाम, प्रफुल पेंदाम यांची उपस्थिती राहतील. आयोजक गायिका, अनिता मसराम यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.