Home नागपूर नागपूरमधील विकास प्रकल्पात नागपुर सह विदर्भातील 1 लाख 13 हजार युवकांना रोजगार...

नागपूरमधील विकास प्रकल्पात नागपुर सह विदर्भातील 1 लाख 13 हजार युवकांना रोजगार प्राप्त – केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती;

29 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

फॉर्च्युन फाऊंडेशनच्या  3 दिवसीय युथ एम्पावरमेंट समिटचे  गडकरींच्या हस्ते   उदघाटन

नागपूर 25 मार्च 2022

नागपूरमधील मिहान विशेष आर्थिक क्षेत्र तसेच मेट्रो प्रकल्प, एमआयडीसी या विकास प्रकल्पामध्ये  गेल्या काही वर्षात नागपुर सह विदर्भातील 1 लाख   13 हजार युवकांना रोजगार प्राप्त  झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली . फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने नागपूरच्या सिवील लाईन्स स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित   3 दिवसीय युथ एम्पावरमेंट समिटच्या  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते .  यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार आणि युथ एम्पावरमेंट समिटचे संयोजक प्रा.  अनिल सोले  प्रामुख्याने उपस्थित होते .

आपल्या देशासमोरची सर्वात मोठी समस्या ही गरिबी, भुखमरी, आणि बेरोजगारी ही असून बेरोजगारीमुळेच गरिबी आणि भुखमरी आहे . त्यामुळे प्रत्येक माणसांना स्वाभिमानाने काम करण्याची संधी मिळाली तर या देशातली गरिबी आणि भुखमरी दूर झाल्याशिवाय राहणार नाही  . तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असे मत  गडकरी यांनी याप्रसंगी व्यक्त केले .

 नागपुरातील फॉर्च्यून फाऊंडेशनच्या वतीने 25, 26 आणि 27 मार्च दरम्यान या 3 दिवसीय युथ एम्पावरमेंट समिटचे आयोजन करण्यात आले असून या युवकांचा महामेळाव्यात 92 कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पाच हजार जागांसाठी ऑफलाईन मुलाखती घेण्यात येत आहे .  याशिवाय विविध बँकांचे स्टॉल लावण्यात आले असून युवकांना मुद्रा,स्टँड अप इंडिया,स्टार्ट अप इंडिया सारख्या महत्वाच्या योजनांची, त्याकरिता लागनाऱ्या कगदपत्रांची माहिती देण्यात येत आहे  तसेच स्वयंरोजगाराकरिता विविध कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले आहे . या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी विदर्भातील  उद्योजक,  युवक,  फॉच्र्यून फाऊंडेशन तसेच विविध  कंपन्याचे पदाधिकारी उपस्थित होते.