Home सामाजिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दारूची दुकाने बंद ठेवण्याची निवेदनातून मागणी;

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला दारूची दुकाने बंद ठेवण्याची निवेदनातून मागणी;

20 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असते परंतु दारूची दुकाने सुरू असल्याने काही नागरिक महाराजांच्या जयंती मध्ये गोंधळ घालतात त्यामुळे महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सर्व दारूची दुकाने बंद करण्यात यावी अशी मागणी दिपक पोहनेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती झाली नाही प्रशासनाने कोव्हीड नियमात शिथिलता दिल्याने या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपशहर प्रमुख दिपक पोहनेकनीं निवेदनाच्या माध्यमातून दिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यासाठी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी शिवसेनेचे दिपक पोहनेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करून प्रत्यक्ष भेट घेतली आहे. याप्रसंगी आमचे सहकारी चंद्रशेखर श्रीराव तसेच संतोष ठाकूर, प्रतीक बहुगुणा, बंटी पंडेल, प्रशांत गोलछा यांची उपस्थिती होती.