डॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत

261

डॉ. ओमकार हरी माळी यांचे उमरेड येथे स्वागत
विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल, उमरेड
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मा. डॉ. ओमकार हरी माळी हे विदर्भ दौºयावर आहेत़ आज गडचिरोली येथे बैठकीला जात असतांना  उमरेड येथे त्यांचे स्वागत करण्यात आले़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरेड विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास झोडापे, सामाजिक कार्यकर्ता कौस्तुभ पवार, राजूभाऊ मेश्राम, दिनेश बुलकुंदे, सारंग म्हैसमारे, अँड. प्रबुद्ध सुखदेवे, रजत वानखेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते़
उमरेड शहरात बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित रँलीच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे दर्शन डॉ. ओमकार हरी माळी यांनी यावेळी घेतले़ शिवाय उपस्थितांशी विविध विषयांवर चर्चा केली व पुढील कार्यक्रमांकरिता गडचिरोलीला रवाना झाले़ तसेच पुन्हा एकदा उमरेड येथे भेट देऊन रोजगारासंदर्भातील चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले़