Home नागपूर उदयनगर में भागवत सप्ताह शुरू 26 तक रंगा रंग आयोजनकोरोना नियमों का...

उदयनगर में भागवत सप्ताह शुरू 26 तक रंगा रंग आयोजनकोरोना नियमों का हो रहा है पालन;

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

 नागपूर :
 प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रीमद भागवत सप्ताहाचे उद्घाटन आमदार मोहन मते यांच्या हस्ते उदयनगर रिंगरोड चौकात दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णकांत (भाईजी) मोहोड, सुभाष बांगडे, प्रकाश जाधव, श्रीमती सुनीता मोहोड ईत्यांदींची विशेष उपस्थिती होती. ठाण्याचे कथाकार नाना महाराज देशमुख जेधे यांचे संगीतमय भागवत पठण होत आहे. ज्यामध्ये ध्रुवचरित्र, चौविस अवतार, श्री कृष्ण जन्मोत्सव, मॉखन चोरी, बाललिला चरित्र, कृष्ण रुक्मिणी विवाह, सुदामा चरित्र इत्यादींचा समावेश आहे. येत्या 26 मार्च रोजी सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण, गोपाळकाला, दहीहंडी, महाप्रसाद वितरण असे कार्यक्रम होणार आहेत.  कोरोना नियमांचे पालन करून भागवत सप्ताह साजरा केला जात आहे. यशस्वीतेसाठी कृष्णकांत (भाईजी) मोहोड, दिवाकर मोहोड, सुदाम शिंगणे, प्रदीप अहिरे, सुनीता मोहोड, राजेश डोर्लीकर, प्रकाश जाधव, राजेश बाळबुधे, राजीव पवार, देवराव वावरे, प्रेमलाल पैगवार, नारायणसिंग ठाकूर, इंदुताई शेगावकर, मनोहर चरडे, संपत वाढई,  कृतिका संकेत इंगळे- देशमुख परिश्रम घेत आहेत.