Home नागपूर सीटू तर्फे जागतिक महिला संघर्ष दिन साजरा.

सीटू तर्फे जागतिक महिला संघर्ष दिन साजरा.

20 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( सीआयटीयू ) नागपूर जिल्हा कमिटी तर्फे जागतिक महिला संघर्ष दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता प्रा.राहुल मुन होते. यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला समितीच्या मंगला जुनघरे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी राजेन्द्र साठे होते. प्रीती मेश्राम, अंजू चोपडे, उज्वला कांबळे, माया कावळे यांचे तसेच शेकडो आशा वर्कर्स यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. हा जागतिक महिला दीन कार्यक्रम नसून जागतिक महिला संघर्ष दीन म्हणून साजरा करावा यावर चर्चा करण्यात. महिलांच्या हक्काकरता महिलांनी केलेल्या संघर्षातून मिळालेली उपलब्धि म्हणून महिला दीन साजरा करण्यात येतो.परंतु भारतातील महिला आजही आपल्या हक्काकराता संघर्ष करीत आहेत हि भारताची मोठी शोकांतिका आहे. असे विचार व्यक्त करण्यात आले. महिलांना पुरुषा प्रमाणे कायद्याने समान अधिकार देऊन श्रमानुसार योग्य मोबदला देण्यात यावा असे विचार मांडण्यात आले.
अध्यक्ष
राजेंद्र साठे