Home नागपूर आशादीप अपंग महिला बाल विकास संस्थेच्या वतीने मसाजोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ.

आशादीप अपंग महिला बाल विकास संस्थेच्या वतीने मसाजोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ.

41 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर: [दिली १६ मार्च ]
आशादीप अपंग महिला बाल विकास संस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या 14 मार्च रोजी दृष्टीबाधितांना आत्मनिर्भर होण्यासाठी “आशादीप” अपंग, महिला-बाल विकास संस्था आणि विदर्भ संशोधन मंडळ यांच्या वतीने विशेष  मसाजोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ नारकॉडचे अध्यक्ष डॉ. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी विदर्भ संशोधन मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटणे, संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. लालासाहेब पाटील, डॉ. प्रतिमा शास्त्री, अपर्णा कुळकर्णी व्यासपीठावर उपस्थित होत्या. संस्थेच्या कार्याची आणि  मसाजोपचार प्रकल्पाची विस्तृत माहिती अध्यक्ष डॉ.प्रतिमा शास्त्री यांनी दिली. प्रशिक्षक अजय कलसे स्वतःदृष्टीबाधित असून यांच्या मार्गदर्शनात घेतल्या जाणाऱ्या ४५ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गात १० प्रशिक्षार्थी या संधीचा लाभ घेणार आहेत. अजय कलसे यांच्या पत्नी लीना कलसे देखील दृष्टीबाधित असून त्या महिला प्रशिक्षर्थिना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षणार्थीना  शुभेच्छा देताना डॉ. राजेंद्र वाटाणे म्हणाले की, एखाद्या अवयवाशिवाय जगण्याचे आव्हान या दिव्यांग मुलांना स्वीकारावे लागते. आशादीपच्या सहयोगाने त्यांना सर्वोपरी साहाय्य करण्याचे सामाजिक दायित्व निभावताना आम्हाला आनंद होत आहे. श्री. लालासाहेब पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत प्रशिक्षणार्थीस शुभेच्छा देऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने मार्गस्थ झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद देशपांडे यांनी नारकॉड तर्फे शक्य ते साह्य करण्याचे आश्वासन देऊन मुलांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी केले, आणि समारोप व आभार प्रदर्शन सहसचिव सुप्रिया केकतपुरे यांनी केले.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थीस आवश्यक किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षक अजय कलसे व सौ. लीना कलसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी मनोगतात माझ्या हातून उत्तम मसाज थेरपिस्ट तयार होतील याची खात्री देत संस्थेचे आभार मानले.