Home नागपूर उदयनगर चौकात शनिवारी सात दिवसीय संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ.

उदयनगर चौकात शनिवारी सात दिवसीय संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ.

19 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर : दि.  १७ मार्च
उदयनगर चौकात शनिवारी सात दिवसीय संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ.
प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 19 ते 25 मार्च दरम्यान मोहोड ट्रेडिंग कंपनी, श्रीराम नगर, रिंगरोड उदयनगर चौक येथे संगीतमय भागवत ज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी पोलीस अधिकारी विनोद पटोले, रमेश काटोले, नितीन चौधरी, शंकरराव वाकुडकर यांची विशेष उपस्थिती होती.  नाना महाराज देशमुख जेधे ठाणेवाले यांच्या हस्ते कथाकथनाची सुरुवात होणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णकांत भाईजी मोहोड यांनी सांगितले. भागवत कथा अभिवाचनाद्वारे होईल.  ज्यामध्ये ध्रुवचरित, श्री कृष्ण जन्मदिवस, बाललिला, माखण चोरी, रुक्मणी विवाह सोहळा, सुदामा चरित्र वाचन, 26 मार्च रोजी दहीहंडी, गायत्री महायज्ञ, गोपाळकाला व महाप्रसाद वाटप होणार आहे. कार्यक्रमात पारितोषिक वितरण व ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई, खेमजीभाई ठक्कर महेंद्रसेठ यांच्या विशेष उपस्थितीत माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. दिवाकर मोहोड, प्रदीप पवार अहिरे, राजेश डोर्लीकर, राजीव पवार, प्रकाश जाधव, राजेश बाळबुधे, देवराव वावरे, प्रेमलाल पैगवार, नारायणसिंह ठाकूर, श्रीमती इंदुताई शेगावकर परिश्रम घेत आहेत.
००००००